Uncategorized

दिव्यांग बांधवांचा आक्रोश आमच्या हक्काचा 5 टक्के निधी द्या : नगर परिषदेवर मोर्चा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- दिव्यांगांना सन 2018 च्या दिव्यांग धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग बांधवांना राखीव निधी देणे बंधनकारक असताना सुद्धा अद्यापही सदर 2018 च्या दिव्यांग धोरणा नुसार उमरखेड शहरातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळाला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून अनेक प्रकारची लक्षवेधी आंदोलने केली. परंतु निगरगठ्ठ व मुजोर प्रशासनाने याकडे कुठलेही लक्ष न देता आजपर्यंत उडवा उडवीचे उत्तरे दिलीप्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या सह कार्यकर्ते व दिव्यांग बांधव आक्रमक होत नगरपरिषद उमरखेड कार्यालयावर असंख्य दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढला. पोलीस प्रशासनाने सदर मोर्चाला गेटवरच अडवले. सर्व आंदोलन करत्यांनी गेटवरच आपला ठिय्या मांडला.
जोपर्यंन्त दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. असा आक्रमक पवित्र प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी व दिव्यांग बांधवांनी घेतला

सदर आंदोलनाच्या वेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधत तात्काळ सदर आंदोलनांचा तोडगा काढावा. असे सुचवल्यानंतर तात्काळ प्रशासन जागी होत चालू वर्षाचा (2025 26 ) वर्षाचा उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल व उर्वरित 2018-2024 पर्यंत चा दिव्यांग राखीव निधी वाटप करण्यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, तालुका प्रमुख सय्यद माजीद, दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुकाप्रमुख बालाजी माने, गोपाल झाडे, श्याम चेके, दिव्यांग क्रांती आंदोलनाची शहर प्रमुख प्रेम रुडे, नारायण भवर, बलवंत तिग्गलवाड, भास्कर गंजेवाड, प्रजेश खंदारे, श्रावण चांगले, आधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसह असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

             चौकट 

सदर प्रकरणात लक्ष घालून दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांनी दोन वेळा जिल्हाधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत सदर प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यासाठी विनंती केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष न घातल्यामुळे अखेर आंदोलन करण्यात आले.

नगरपरिषद उमरखेड वर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या यशस्वी सांगते नंतर ग्रामीण भागातील दिव्यांगांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग राखीव निधी मिळावा यासाठी दिव्यांग बांधवांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत येत्या पंधरा दिवसात सदर सर्व ग्रामपंचायत ती मधील दिव्यांग बांधवांना निधी वाटप करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button