Uncategorized

उमरखेडमध्ये ४७ ग्रामपंचायतींवर येणार महिलाराज ओबीसींसाठी २५, अनुसूचित जातीसाठी सुटल्या १८ जागा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : उमरखेड तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत येथील जिजाऊ भवनात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ९२ पैकी ४७ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच राहणार असून यामध्ये सर्वसाधारण वर्गातील महिला, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि ओबीसी महिलांचा समावेश आहे. तर उर्वरित ४५ ग्रामपंचायतवर याच प्रवर्गातील पुरुषांना स्थान मिळणार आहे.
९२ पैकी ३५ जागा सर्वसाधारण यामध्ये महिलांसाठी सिंदगी, गांजेगाव

१७ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण खुले असणार आहे.

मरसूळ, बोरी, चातारी, कारखेड, दिघडी, उंचवडद, चिंचोली, धानोरा सा, जेवली, कुरळी, बाळदी, चातारी, वरूड बीबी, खरबी, नारळी, नागापूर (प) व बारा या १८ गावांचे सरपंचपद राहणार आहे. तर उर्वरित झाडगाव, पिंपरी दिवट, नागेशवाडी, जनुना, टाकळी (ई) थेरडी, अमडापूर, मेट, देवसरी, परजना, मुळावा, चालगणी, पार्टी (बं) बेलखेड, तिवडी, पोफाळी व कळमुळा या १७ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले असणार आहे. अनुसुचीत जातीसाठी तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सुटले आहे. यात ९ सरपंचपदे एससी महिलांसाठी असतील. यात दहागाव, पळशी, कोपरा (खु) सोईट (म) कुपटी, तिवरंग, खरुस (बु) बिटरगाव (खु) सुकळी (न) या जागांचा समावेश आहे. उर्वरित मन्याळी, सावळेश्वर, हरदडा, लोहरा, विड्डुळ, डोंगरगाव, चिंचोली (सं)वानेगाव, हातला या नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी तालुक्यातील ग्रामपंचायती राखीव झाल्या असून महिलांसाठी करंजी, साखरा, अकोली, लिंबगव्हाण, बिटरगाव (बु) तरोडा, बोरगाव, बोथा (वन) अंबाळी, सुकळी (ज) पिंपळदरी, बोरी (वन) चिल्ली (ज) या १३ ग्रामपंचायतीचे आरक्षण आहे. टाकळी (रा) कृष्णापूर, मोहदरी, मानकेश्वर, पिरंजी, मार्लेगाव, कोपरा (बु) धनज, मोरचंडी, कोरटा दिंडाळा,अमानपूर या १२ जागाही ओबीसीसाठी असतील. या व्यतीरिक्त अनुसूचित जमातीसाठी ९२ पैकी १४ ग्रामपंचायती राखीव झाल्या असून यातील ब्राह्मणगाव, चुरमुरा, टाकळी (वन) नागापूर (रु) पिंपळगाव (वन) सोनदाभी, मुरली या ७ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी आहेत. तर सोईट (घ) निंगणुर, चिखली (वन) टेंभुरदरा, भवानी, दराटी व खरुस (खु) या ७ग्रामपंचायतीही अनुसूचित जमातीसाठी असतील.

            चौकट 

नेत्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’

उमरखेड तालुक्यातील मुळावा, विडुळ, चातारी, देवसरी, ब्राह्मणगाव, दराटी, बिटरगाव (बु) निंगणुर, सुकळी (ज) नागापुर (प) पोफाळी या ग्रामपंचायती उमरखेडच्या राजकीय दृष्टिकोणातून महत्त्वाच्या मानल्या जातात.

या ग्रामपंचायतीतील सरपंचपदे राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक सर्वच पक्षांच्या नेत्यामध्ये कहीं खुशी, कहीं गम दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधली होती. मात्र निघालेल्या आरक्षणाने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button