Uncategorized

७/१२’ कोरा पायी यात्रेचा दारव्हा तालुक्यात प्रवेश

बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात भर पावसात यात्रा मार्गस्थ


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


आज दारव्हा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ७/१२ कोरा या यात्रेची सुरुवात भारताचे पहिले कृषिमंत्री स्व. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावातून काल सुरू केली होती अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेली यात्रा वाशिम जिल्ह्यातुन प्रवास करत आज यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लोही या गावी पोचली व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने यात्रेचे स्वागत मोठ्या थाटात केले ७/१२’ कोरा ही पायी यात्रा सध्या दारव्हा तालुक्यातून संघर्षमय प्रवास करत आहे. शेतकरी, शेतमजूर, विधवा, अपंग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांचे हक्क शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही जनचळवळ उभी राहिली आहे

यात सर्वपक्षीय नेत्यांना नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे

यात्रेने दारव्हा तालुक्यात लोही गावातून प्रवेश केला, जिथे स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागाने यात्रेचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या जल्लोषात यात्रेचे आगमन झाले. विविध संघटना, युवक मंडळे आणि महिला गटांनी यात्रेतील कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व परिसर अपना भिडू बच्चू कडू या घोषणेने परिसर दणाणला होता

ही यात्रा लोही येथून पुढे तरणोळीमार्गे मानकी येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर दिनांक १० जुलै रोजी तळेगाव येथे थांबा घेत दारव्हा शहरात पोहोचणार आहे. यानंतर वळसा येथे मुक्काम घेत, लाखखिंड मार्गे यात्रा दिग्रस तालुक्यात प्रवेश करेल त्यानंतर १७ जुलै रोजी महागाव आंबोळा येथे यात्रेची सांगता होणार आहे दारव्हा तालुक्यातील दोन दिवसांचा हा प्रवास सामाजिक संवादाने भरलेला असणार आहे

यात्रेमध्ये भर पावसातही कार्यकर्त्यांची आगेकूच सुरू आहे. ओल्या कपड्यांमध्ये, चिखलातून वाट काढत कार्यकर्ते न थकता चालत आहेत. यावरूनच ही यात्रा ही केवळ आंदोलन नसून, हक्कासाठीचा निर्धार असल्याचे स्पष्ट होते

पक्षीय राजकारणापासून दूर राहून, ही यात्रा शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडित मुद्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. मार्गावर विविध गावांमधून पदयात्री स्थानिक नागरिकांशी संवाद साधत असून, त्यांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या ऐकून घेतल्या जात आहेत यामुळे प्रत्येक गावातील नागरिक व सर्व पक्ष नेते या यात्रेत आपला सहभाग नोंदवत आहे

यात्रेमध्ये मांडल्या जाणाऱ्या प्रमुख मागण्या:

शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी सक्तीच्या कर्जवसुलीला आळा आत्महत्यांविरोधात प्रभावी धोरण विधवा व अपंगांसाठी रोजगार व सुरक्षा योजना मनरेगामध्ये सुधारणा

तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

दारव्हा तालुक्यातील नागरिकांमध्ये या यात्रेमुळे जागरुकता निर्माण झाली असून, “ही यात्रा शासनाला ग्रामीण समाजाच्या वास्तवाची जाणीव करून देणारा जिवंत लढा आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button