Uncategorized

मुख्अधिकारी नगरपरिषद पुसद त्यांच्या दालनासमोर कचरा भेट अंदोलन,पु


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
नगर परीषद पुसद मधे प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने मुख्याधीकारी नगर परीषद पुसद यांना भारतीय जनता पार्टी पदाधीकारी पुसद व नागरिकांच्या वतीने नगरपरिषद पुसद मुख्याधीकारी कक्षा बाहेर कचरा टाकुन जाहीर निषेध केला. अत्यंत तिव्र आंदोलन करण्यात आले.
‌‌ या पुर्वी अनेकवेळा निवेदन देऊन भेटी घेऊन, भारतीय जनता पार्टी पुसद पदाधिकारी यांनी वारंवार विनंती केल्या होत्या. परंतु नगरपरिषद पुसद हे गुप्त ठेकेदार यांना सोडायला तयारच नव्हते.
शेवटी आज दि ८जुलै२०२५ सकाळी ११वाजता सौ अनिता भारत चव्हाण (पाटील), सौ.स्वातीताई सुभाष पद्मवार माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक १४ पुसद यांच्या नेतृत्वात, भाजपा जेष्ठ नेते विनोदभाऊ जिल्हेवार यांच्या मार्गदर्शनात कै. वसंतराव नाईक चौक पुसद येथुन कचरा गोळा करतीत स्टेट बँक चौक नविन पुसद, कोषटवार शाळा, नगरपरिषद पुसद येथे कचराभेट आंदोलन करण्यात आले.
नगर परीषद पुसद येथे मुख्याधिकारी यांनी तगडा पोलीस बंदोबस्त असतांनाही भाजपा पदाधिकारी हे नगर परिषद पुसद मधे शिरले, या कचराभेट आंदोलनात भारत पाटील, निखिलभाऊ चिद्दरवार, शामभाऊ जोशी, महेशभाऊ नाईक, अजयभाऊ पुरोहीत, विश्वासभाऊ भवरे, रविजी ग्यानचंदाणी, दर्शन जोगदंडे, सुरेश तिवारी, शेखर वानखेडे, नारायणराव पाटील मुडाणकर, योगेशभाऊ राजे,कैलास गावनर सर,विजुभाऊ पुरोहीत, माधवराव भरगाडे, गोविंदराव कुकडे, दिपालीताई जाधव, रुपालीताई जयस्वाल, शितलताई उतळे, सुषमाताई भगत,सुभाषभाऊ पद्मवार,दिलीपमामा रायपुरकर,रमेशसेठ सोमाणी, सुरजभाऊ कुरील, विक्रांत जिल्हेवार, अभिजीत पद्मवार, महेश काळे, सतीष कानडे, राहुल कुरील
प्रभागातील नागरिक सविताताई पारटकर, स्मिता बिडवई, हिनाताई खोडियार, मनिषाताई देशमुख, शिवरात्रीवार ताई,रष्मिताई करे, संगिताताई भोरे, प्रमिलाताई राय, खोलगडेताई, प्रमोद दिंडे, अभिजीत गंधेवार, गणेश चेलमेलवार, आदित्य सोनि, खेमानंद मेहता महाराज, स्वप्निल गवळी, दिपक चिरडे, डॉ किरण तगलपल्लेवार, निखिल गादेवार येरावार लेआऊट, सह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button