Uncategorized
सोनदाबी ते बोरगाव येथे फॉरेस्ट हद्दीत पर्यटन साठी आलेला रोडचा निधी हडप ! रोड न करता आर एफ ओ रोडगे यांनी कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीमध्ये केला भ्रष्टाचार !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उंबरखेड उपविभागीय वनपरिक्षेत्रात सोनदाबी ते बोरगाव या फॉरेस्ट हद्दीत पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना लोकांना जाणे येणे करता यावी म्हणून पर्यटन विकासाकरिता 15 लाख रुपये निधी उपलब्ध करून घेतला होता. त्यामध्ये फॉरेस्ट हद्दीमध्ये सोन दाबी ते बोरगाव या रोडचे काम दाखवण्यात आले. परंतु फॉरेस्ट ऑफिसर सोंनदाबी आर बी रोडगे यांनी रोड कागदोपत्री दाखवून पर्यटन स्थळ च्या निधीमध्ये उचल करून भ्रष्टाचार केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे बिटरगाव चा चार्ज आहे . त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रे कामाची पाहणी करून कारवाई करावी करिता पर्यटन विकास मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार झाली आहे . त्यामुळे आर बी रोडगे यांनी कागदपत्रे दाखवलेल्या कामाची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



