Uncategorized

चातारी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- चातारी : महसूल मंडळ चातारी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत दि./04/07/2025 रोजी विविध दाखले,उत्पन्नाचे प्रमाणपत्र अधिवास , जातीचे दाखले, सातबारा वारसा फेरफार नवीन शिधापत्रिका, संजय गांधी, श्रावण बाळ योजनांचा लाभ व तसेच कृषी विभागा अंतर्गत फळबाग बांबू, तुती लागवड व इतर योजनेची माहिती देऊन शेतकऱ्यांना लाभ घेण्यास सांगण्यात आले आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले. चातारी,धार चातारी, बोरी, ब्राह्मणगाव परजना, कोपरा बु. हरदडा धानोरा दिघडी, उंचवडद, देवसरी, लोहरा कारखेड या गावातील पात्र लाभार्थी यांनी शिबिराचा लाभ घेतला शिबिराकरिता उमरखेड तहसीलदार श्री राजू सुरडकर यांचे आदेशानुसार मंडळ अधिकारी प्रकाश माने, ग्राम महसूल अधिकारी श्री गणपती क्षीरसागर, शिवाजी कांबळे, सतीश गजभार, राहुल चव्हाण, गजानन चव्हाण, प्रकाश शेळके , महसूल सेवक सुदर्शन गोस्वामी, बाळू सूर्यवंशी, सदानंद गंधपवाड व कृषी विभाग गजानन कापसे सहाय्यक कृषी अधिकारी व सेतूचालक भागाजी शिवरतवाड, माधव माने हजर होते. यावेळी अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button