Uncategorized

पुसद नगर परिषद हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 14 रोडची दुर्दशा! वार्ड मधले नागरिक हैरान .


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद नगरपालिका हद्दीमध्ये श्री राज पार्क ते ममता निवास 300/ मीटरचा रस्ता असून त्यासाठी 7 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे .प्रत्येक वेळी तक्रार करून सुद्धा काही केले जात नाही फक्त आश्वासन मात्र न चुकता देतात.वार्ड नंबर 14 मध्ये पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना चिखलातून तारेवरची कसरत करून पैदल जावे लागत आहे .परंतु नगरपरिषद अधिकारी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले .नेते मंडळींना नागरिकांनी यावेळेस निवडणुकीमध्ये चांगलाच आपला झटका दाखवायच्या तयारीत आहे. तशीच चर्चा सुद्धा सुरू आहे. वार्डामधील नागरिकांनी वारंवार मंत्री महोदय यांच्या चर्चा करून लेखी तक्रार सुद्धा दिले आहे . त्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु नागरिकांच्या वार्डात सुख सुविधा उपलब्ध करून देणे हे नगर परिषद प्रशासनाचे काम आहे वार्ड मध्ये लेआउट करताना लेआउट धारकांनी रोड व नाल्या सुविधा केल्या नसेल तर लेआउट धारकाकडून त्याचे प्लॉट जप्त करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपरिषदचे कर्तव्य आहे. येणे होताना नगरपरिषद एनओसी दिल्याशिवाय प्लॉटच्या खरेदी होत नाही अशावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांनी एनओसी दिली कशी हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 14 येथील रोड व नाली चे काम लवकरात लवकर करून द्यायची मागणी नागरिकांनी यावेळेस प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button