भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रिय ओबीसी मोर्चा द्वारे विविध मांगण्यासाठी ढानकी येथे निवेदन देण्यात आले

.
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ह्या राष्ट्रव्यापी संघटनाद्वारे वामन मेश्राम साहेब तथा चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात आज 1 जुलै 2025 रोजी 31 राज्य 650 जिल्ह्यांमध्ये भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते.
ओबीसी जनगणनेच्या समर्थनात आम्ही उतरलो मैदानात, वक्फ संशोधन विधेयक रद्द झालेच पाहिजे,भारतीय संविधानाचा विजय असो.
ह्या नाऱ्यांसह भारत बंद अंतर्गत आज ढानकी येथे भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबिसी वर्ग मोर्चा
या संघटनाद्वारे महामहीम राष्ट्रपती यांना ठाणेदार ढानकी पोलिस स्टेशन यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यामध्ये EVM मशीन बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात. ओबीसिंसह सर्व जातींची जातिनिहाय जनगणना व्हावी.आरएसएस बिजेपि च्या केंद्र सरकार मधील अनेक पदाधिकाऱ्यांद्वारे वारंवार मूलनिवासी बहुजन महापुरुषांचा अपमान या विरोधात कार्यवाही व्हावी.

वक्फ संशोधन विधेयक 2025 संविधान विरोधी असून ते रद्द करावे.आदिवासींची पाचवी सहावी अनुसूची लागू करावी,तसेच ढानकी येथील तेंभेश्वर नगर येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या निवासी जमिनीची मालकी देण्यात यावी.यांसह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
ह्या आंदोलनाचे नेतृत्व अमोल पाटील,कुलदीप देवसरकर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शक भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय महासचिव विद्वान केवटे,भारत मुक्ती मोर्चा चे अनिल लहाने, लहुजी क्रांती मोर्चा चे विनोद बनसोडे,संजय बनसोडे, दिलीप कलाले,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे मिलिंद चिकाटे,मल्हारी दवणे,छत्रपती क्रांती सेनेचे कृष्णा पाटील चंद्रवंशी,दिगंबर कदम, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आशुतोष तारमेकवाड,राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बार भाई,सलीम भाई,अतिक भाई,मुनव्वर खान पठाण, भाई,रफिक भाई,सलमान भाई,शाहरुख पठाण,शेख माजीद,राष्ट्रीय गोर बंजारा क्रांति संघाचे तिलक राठोड,भारतीय युवा मोर्चा चे राहुल गायकवाड,ओबीसी मोर्चाचे सुनील भोने,जयशील कांबळे,यांसह समजिकसंघटनांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अठरापगड जाती धर्मातील नागरिकांनी सदर निवेदन देताना भगवा,हिरवा, निळा,पिवळा झेंडा हाती घेऊन सामजिक एकतेचा संदेश दिला.जो पंचक्रोशीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.



