त्या चिखलमय रस्त्याची दुरुस्ती करून गतिरोधक बसवा,(आझाद समाज पक्षाची मागणी)

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक ते संविधान चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे , या रस्त्यात चिखल साचल्यामुळे घसरगुंडी तयार झाली आहे रस्त्याच्या दोन्ही कडेने नालीचे बांधकाम झाल्यामुळे रस्त्याच्या कडेची माती रस्त्यावर येऊन मोठा चिखल साचला आहे, या रस्त्यावरून जाताना अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत,याच रस्त्याने शेकडे विद्यार्थीनि ये जा करतात याच रस्त्यालगत असलेल्या स्वामी पेंडसे गुरुजी, एम सी सी इंग्लिश मीडियम स्कूल, स्वर्गीय गुलाब सिंह ठाकुर प्राथमिक शाळा , जुने बस स्टँड चौक नवीन बस स्टँड चौक, या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे असून सदर रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अनेक वेळा भरधाव वाहनामुळे अपघात होऊन जीवित हानी सुद्धा झाली आहे, या रस्त्याने शाळेत जाण्याकरिता पैदल, सायकलने, दुचाकीने ढाणकी सह जवळपास 50 खेड्यापाड्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करीत असतात , सदर चिखल साचलेल्या रस्त्याचे दुरुस्ती करून त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा आजाद समाज पक्षाच्या वतीने याच रस्त्यावर बसून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, ढाणकी शहराध्यक्ष, गोलू मुनेश्वर, समाधान राऊत, आबा गायकवाड, सचिन वाहुळे, राहुल धुळधुळे, आत्माराम आडे, आशिष खडसे उपस्थित होते



