बाळदी गावात मोक्षधाम चा प्रश्न ऐरणीवर भर पावसात मृतदेहाचा अंत्यविधी

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात जिवंतपणे ही त्रास व मरण पावल्यानंतर सुद्धा सहन कराव्या लागतात यातना. प्रेताला अग्नी देण्यासाठी व भर पावसात लाकड रचन्या साठी ताडपत्रीचा सहारा घेऊन लाकडं रचण्याची पूर्ण विधी करण्यात आला. बाळदी गावात जिवंतपणे यातना सहन करावेच लागतात, परंतु मेल्यानंतरही प्रेताला यातना सहन करावे लागत आहे.गावात प्रेताला अग्नि देण्यासाठी दहन शेड नसल्यामुळे प्रेतावर ताडपत्रीचा सहारा घेऊन प्रेताला भर पावसात अग्नी देण्यात आली आहे.एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत्सोव मोठ्या गाजावाजात करत आहोत पण, बाळदी गावांमध्ये स्मशानभूमीच नाही, ही फार मोठी शोकांकिता आहे,अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे.गावातील बाळदी या गावात नारायण गीमेकर यांच्या वडीलाचं दु:खत निधन झाल.अंत्यविधीसाठी बाहेरगावावरून पाहुणे आले असता त्यांना एक दुर्दैवी बाब लक्षात आली की या गावात सार्वजनिक मोक्षधाम उपलब्ध नाही खूप निंदनीय गोष्ट आहे. वरून पाऊस चालू या परस्थिती मध्ये दु:खत कुटुंबाने करायचं काय? श्रद्धांजली अर्पण करत असताना पावणे मंडळी यांच्या मध्ये एकच चर्चा रंगली होती ग्रामपंचायत गावात आहे की नाही पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी आहे की नाही. याला जबाबदार कोण असा महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
आता आमदार साहेब तुम्हीच या समस्येवर निधी उपलब्ध करून द्यावा स्मशानभूमीचे काम त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.



