Uncategorized

फुलसांवगी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 6 संचालकांनी संस्थेची फसवणूक केल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राप्त! सहाय्यक निबंध पुसद

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात फुलसांवगी येथील सहकारी संस्था र. न. 909 या संस्थेमधील तात्काली संचालक श्री स्वप्निल शेषराव नाईक, विठ्ठल वामन वानखडे, उषाताई जयंता राठोड, व तात्कालीन संचालक शेख हमित शेख मस्तान, विलास थावरा चव्हाण ,या संचालक मंडळाने अभ्यास दौरा करण्याकरता ठराव घेऊन संस्थेतून एक लाख रुपये मंजूर केले व कोणताही अभ्यास दौरा न करता संस्थेच्या निधीचा दुरुपयोग केला. व अभ्यास दौरा दाखवतांनी खोटे प्रमाणपत्र संस्थेत सादर केले. तिन संस्थेचे सचिव एकच आहे तिन संस्था कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही. तसे दाखल केलेला दाखला हा फुलसांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा तयार केलेला आहे. व तो खोटा असल्याचे नमूद केले आहे. तिन्ही संस्थेकडे कर्ज व्यवहार कसे होतात व त्याची वाटप कशा पद्धतीने होते याबाबत तोंडी चर्चा करण्यात आली आहे

.फुलसुंवगी संस्थेत या तिन्हीही संस्थेने कोणत्याही प्रमाणपत्र दिले नाही. असा लेखी खुलासा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भोर तालुका भोर जिल्हा पुणे यांनी 14 -1 -2025 रोजी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे सादर केला .महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 87 आदेश सहाय्यक निबंध पुसद सुनील भालेराव यांनी कलम 83 चौकशी करून अहवाल दिनांक 26 जुलै 2024 रोजी अहवालामध्ये संस्थेचे 11 संचालकापैकी 6 संचालक अभ्यास दौरा करिता गेलेले असल्याने वाहन भाड्याकरिता जास्त रक्कम 37 हजार 218 रुपये व जेवणावर व नास्त्यावर खर्च 17,600 रुपये व किरकोळ खर्च 6, 936 असे एकूण 61,754 रुपये अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या संचालकाकडून वसूल करण्याचे कलम 83 च्या चौकशी आदेश मध्ये दिनांक 26 जुलै 2024 रोजी केले होते. त्या आदेशा च्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 87 नुसार नुसार दिनांक 3-2-2025 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद श्री सुनील भालेराव यांनी आदेश पारित करून आदेश प्रत सहकारी संस्था फुलसांवगी सचिव यांना पाठवण्यात आली. त्यामध्ये वरील सहा संचालक दोषी असल्याचे सिद्ध झाल्यावर कारवाई करता पत्र प्राप्त झाले .तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना त्यांची प्रत देण्यात आली त्यामुळे जिल्हा निबंधक यांनी 17 -6- 2025 रोजी सहाय्यक निबंधक पुसद यांना श्री मन्सूरउद्दीन बद्रुद्दीन नबाब संचालक यांनी तक्रार दिल्यामुळे दोषी संचालकावर संस्थेची फसवणूक केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचे केलेल्या तक्राररीतील मुद्द्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती कारवाई करावी, व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना माहिती द्यावी.असे पत्र प्राप्त होताच संचालक यांचे धाबे दणाणले आहे. तक्रारकर्त्यांनी 20-6-2025 रोजी जिल्हा उपनिबंधक यांना लेखी पत्र देऊन दोषी संचालक अपात्र करून रक्कम वसूल करावी व फौजदारी गुन्हे लवकरात लवकर दाखल करावे अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिल्यामुळे. दोषी संचालक आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव तंत्राचा उपयोग करीत असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे सहाय्यक निबंधक पुसद यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button