Uncategorized

लोअर पुस वेणी धरण अभियंता अविनाश भगत यांची सीएमओ सचिवालय कार्यालयाकडून चौकशी सुरू


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

आ . किसनराव वानखेडे भ्रष्टाचार प्रकरणी काय भूमिका घेतात ? या कडे जनतेचे लक्ष ! ( धरणाच्या गेट जवळील अडकलेला काडीकचरा , लाकूड फाटे , लवाळ , जलपर्णी काढण्याच्या बहाण्याने १५० लक्ष रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण ) महागाव तालुक्यातील धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असताना धरण निर्मितीपासून आजपर्यंत पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी भ्रष्ट कारभारामुळे प्रकल्पाचे पार लचके तोडून खाल्ले आहेत ! धरण निर्मितीपासून प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उजागर होण्याची शक्यता आहे ! एप्रिल २०२५ मध्ये महागाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे धरणातील संरक्षित कोट्यातून पाणी सोडण्यासाठी पाणीटंचाई आढावा बैठकीत राज्य मंत्री मा . इंद्रनील नाईक , आमदार किसनराव वानखेडे यांच्या उपस्थितीत ठराव मंजूर करून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नदीपात्रात अभियंत्याने पाणी सोडणे अपेक्षित असताना धरणाच्या गेट जवळ लाकडाची खोंड, काडीकचरा , जलपर्णी अडकल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडणे अशक्य असल्याचे खोटे बोलून प्रकल्प अभियंता अविनाश भगत यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे काडीकचरा , जलपर्णी काढण्याच्या बहाण्याने दिड कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतले व दीड कोटी रुपयांची उचल करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे . वास्तवात चार ते पाच लाख रुपयांमध्ये हे काम करून दीड कोटी रुपये बिले काढल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता अनंत नागरगोजे यांनी अविनाश भगत यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून जिल्हा पाटबंधारे विभाग क्रमांक ४ च्या अधीक्षक अभियंता जाधव मॅडम , जिल्हाधिकारी तसेच पीएमओ कार्यालयाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे ! त्या तक्रारीची दखल घेऊन सुदर्शन गायकवाड विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवाले कक्ष जिल्हा कार्यालय यवतमाळ त्यांनी ई-मेल द्वारे संबंधित विभागाला दिनांक 5-6- 2025 रोजी चौकशी करून अहवाल सादर करा असे अध्यक्ष अभियंता पाटबंधारे विभाग यवतमाळ यांना पत्र दिले परंतु सदर अभियंता वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करून कार्यवाही थांबविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे समजते. तसेच अविनाश भगत हे पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे त्यांनी धरणावरील लाईट बसवण्यामध्ये भ्रष्टाचार केला परंतु कोणतेही लाईट सुरु नाही तसेच झाडे झुडपे तोडणे व इतर खर्च कॅनॉल दुरुस्तीच्या नावाने मोठा भ्रष्टाचार केला आहे .त्यांच्या काळात झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी तक्रार झाली आहे.येत्या काळात सदर प्रकरणात चौकशी होऊन प्रकल्प अभियंत्यावर कारवाई न झाल्यास पाटबंधारे मंत्री यांचे कडे दाद मागून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यासाठी विचार विनिमय चालू आहे ! या भ्रष्टाचार प्रकरणी विभागाचे आमदार किसनराव वानखेडे कोणती भूमिका घेतात ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक शिष्ट मंडळ पालकमंत्री संजय भाऊ राठोड ,जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन सदर भ्रष्टाचार प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्याची विनंती करणार असल्याचे समजते ! सदर प्रकरणात प्रकल्प अभियंत्यावर कारवाई न झाल्यास प्रकल्प क्षेत्रातील शेतकरी उपोषणास बसण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button