Uncategorized

आम्हाला मालक बनता येणार नाही, आमदार लोणीकरांना समज देणार; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोज:

भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. आमदार लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका भाषणामध्ये सरकार आणि स्वत:च्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी बोलताना शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहे. तसेच सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी करत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत लोणीकर यांना समज देण्यात येईल असं म्हटले आहे. मुख्यमंत्री आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं वक्तव्य केलं असलं तर तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कुणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे जे वक्तव्य आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना समज देण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते आमदार बबनराव लोणीकर?

ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच – सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला आहे. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहिण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत.

तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो, आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का? असं वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी केले होते. त्यांच्या या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!