Uncategorized

बिजोरा येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्याच्या शेतात ढाळीचे बांध नावालाच?


(, जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक झाला ठेकेदार)
महागाव तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फुकटामध्ये ढाळी चे बांध टाकून शेतामधले पाणी व्यवस्थित निघून जावे व शेती शेतकऱ्यांना जमीन सुपीक करता यावी म्हणून शासनाने ही योजना अमलात आणली परंतु महागाव येथील ठेकेदार यांनी योजनेचा ठेका घेऊन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे नियोजन आखले आहे.ही योजना उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये पीक नसताना शेतकऱ्यांच्या शेतात (ढाळी)बांधाचे काम करायला पाहिजे परंतु मे महिन्यामध्ये कामे सुरू तर केली परंतु अति पाऊस आल्यामुळे सावरा सावळी केलेले काम वाहून गेले .एस डी ओ कृषी अधिकारी पुसद यांच्या कार्यालयातून टेंडर मॅनेज करून गुटे कंट्रक्शन कंपनी च्या नावाने टेंडर मंजूर केले शिक्षक झाला ठेकेदार बिजोरा येथील शाळेवर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असताना आपल्या जागी तीनशे रुपये रोजाने प्रायव्हेट व्यक्ती शाळेवर लावल्यामुळे तेथील विद्यार्थी संख्या कमी झाली तो तो ठेकेदारीचे कामे करत असून शाळेवर रोजंदारी लावल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . त्याची तक्रार सुद्धा झाली आहे.तसेच कृषी विभागामार्फत कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने टेंडर मंजूर करून ढाळी चे बांध मंजूर करून कामे न करता थातूरमातूर केलेल्या कामावर शासनाचे मेजरमेंट नुसार बिल काढत असल्याचे निर्देशनास आले. त्यामुळे या कामाची संपूर्ण मेजरमेंट पाहणी करून कामे न करता बिले निघणार नाहीत आबाड धोबाड कामाची बिले निघणार नाहीत व त्याचे मेजरमेंट सुद्धा होणार नाहीत. असे कृषी प्रवेशक चेके यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button