Uncategorized

सहकार महर्षी स्व. भाउसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था उमरखेड च्या संचालक मंडळाने घेतला शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाचा ठराव

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड :संपूर्ण तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या सहकार महर्षी स्व. भाउसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाच्या दि. १८ जून २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत शेतकऱ्यांचे कर्जमाफी होण्या संबंधात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबद संस्थेचे संचालक उद्धव गायकवाड यांनी सभेपुढे प्रस्ताव ठेवून चर्चा करण्याची मागणी केली असता यावर संचालक डॉ. संजय माने यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभेतील उपस्थित अध्यक्ष श्री शिवाजीराव माने, उपाध्यक्ष अँड जितेंद्र पवार, मानद सचिव चितांगराव कदम व सर्व संचालकांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे कर्ज माफी देण्यात यावी करिता ठराव घेतला असुन राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शेतकरी राजा मेटाकुटीस येऊन हतबल झाल्याचे चित्र महाराष्ट्रात उभे आहे. एका पाठोपाठ होणाऱ्या शेतकरी आत्महत्यां, कर्ज बाजारीपण, आसमानी संकटात सापडलेले शेतकरी शासनास वारंवार विनंत्या व उपोषण करीत आहेत तसेच शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती होण्याकरीता विविध संघटना आंदोलने करीत आहेत.
दरवर्षीच वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीच्या दिवसात वाढ झाली असून पाऊसमान अनिश्चित झाल्याने त्याचा पिक उत्पादनावर फटका बसला आहे. यामुळे शेती क्षेत्रात अनिश्चितता वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पुर्ण केली आहेत. परंतु मुग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राची सुरुवात होऊन सुद्धा अजून पावसाची समाधानकारक सुरुवात नसल्याने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कुटुंब पुरता: शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे अशा अनेक अवकृपेमुळे जीवन जगणे अतिशय अवघड झालेले आहे, करिता जीन प्रेस संस्थेच्या संचालक मंडळाने १८ जून रोजी झालेल्या सभेत उमरखेड तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद व सदर संस्थेच्या वतीने शासनास विनंती करून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने लवकरात लवकर घेऊन त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होवावी करिता केलेला निर्णय शासनास पाठविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
दिनांक १८ जून रोजी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जीन प्रेस च्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला असल्याने यानंतर याच प्रमाणे दिनांक 23 जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने अशाच प्रकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासंबंधी संचालक मंडळ सभेमध्ये ठराव करून निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक शेतकरी संघाचे जीन प्रेस संस्थेचे संचालक उद्धव गायकवाड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराव पाटील चंद्रवंशी या दोघांनी सदरील कर्जमाफीचा प्रस्ताव सभेपुढे मांडला असल्याने सत्यशोधक शेतकरी संघातील सर्व नेतेमंडळीने संघाचे संचालक चंद्रवंशी आणि गायकवाड यांनी सुचविलेल्या प्रस्तावास दोन्हीही सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव आणि संपूर्ण संचालक मंडळाचे त्यांनी घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाचे संस्थेचे सर्व सभासद व शेतकरी बांधवांन तर्फे सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

चौकट:

जीन प्रेस व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळाने शेतकरी हिताच्या दृष्टी ने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
डॉ विजय माने
अध्यक्ष

सत्यशोधक शेतकरी संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!