२१ जून रोजी जागतीक योग् दिनाचे आयोजन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : दि . १९ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उमरखेड येथे पतंजली योग समिती व नगरपरिषद उमरखेड यांचे संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्याचे ठरविले आहे हा कार्यक्रम ढाणकी रोडवरील अनंतराव देवसरकर सांस्कृतिक सभागृह वाशिम अर्बन बँकेसमोर नाथ नगर रोड उमरखेड या ठिकाणी 21 जून रोजी सकाळी पाच ते सात या दरम्यान होणार असल्याचे पतंजली योग समितीचे तथा भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा सह प्रभारी ॲड विलासराव देवसरकर यांनी सांगितले योग ऋषी स्वामी रामदेव बाबांनी “समृद्ध जीवनासाठी आरोग्य ” आणि “आरोग्यासाठी योग ” हा महत्त्वाचा संदेश जगाला दिला शासकीय स्तरावर सुध्दा जगभर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केल्या जातो त्यानुसार उमरखेड येथे या शिबिरात योगशिक्षक ॲड विलासराव देवसरकर, यशवंत गीरी , प्रकाश दुधेवार, आनंद देशमुख हे साधकांना योगाचे प्रात्यक्षिक तथा योग शिक्षण देतील या कार्यक्रमाला योग प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पतंजली योग समितीने केले आहे