Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचा सहभाग

सारडा पेट्रोलपंप हटविण्यासाठी उपोषणाला सुरूवात

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : शहराततील छत्रपती शिवाजी
महाराज चौकात चालक सारडा यांच्या पेट्रोल पंपची लिज संपुष्टात आल्याने ती वाढवून देऊ नये. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचे उपाध्यक्ष गजानन देशमुख यांनी १८ जून पासुन उपोषणाला सुरुवात केली आहे.ज्यावेळेस हा पेट्रोल पंप शहरांमध्ये सुरू झाला त्यावेळेस शहराची लोकसंख्या जेमतेम ५००० इतकी होती. आज रोजी उमरखेड शहराची लोकसंख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. शहरामध्ये विविध सण, उत्सव, मिरवणूक राजकीय पक्षाची आंदोलने या चौकात होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा पेट्रोल पंप अतिशय धोकादायक असून पेट्रोल पंपाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू असून ते प्रगतीपथावर आहे नगरपरिषदेची भव्य दिव्य इमारत त्याच पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आहे त्यामध्ये उमरखेड शहरातील नागरिकांची महत्त्वपूर्ण दस्तावेज असून एखादी दुर्घटना घडल्यास जीवित्व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. (प्रति.)

           चौकट 

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषचावर ठाम राहण्याचा निर्धार
शासन व प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचे उपाध्यक्ष गजानन देशमुख भांभरखेडेकर यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!