बाळदी रोडला रानटी डुकराच्या टोळीमध्ये प्रचंड वाढ

शेख मुजाहिद ससंपादक मो.779306192
उमरखेड तालुक्यातील गोपिकाबई सिताराम गावंडे महाविद्यालयापासून अवघ्या तीन किलमीटरवर असलेल्या बाळदी रोडवर डुकराणे चांगलेच थैमान घातले असून गावातील रामेश्वर लंगोटे हा व्यक्ती आपल्या कामावरून घरी येत असताना अचानक एक डुकराची टोळी त्याच्या गाडीवर जोरात आली व त्यामध्ये मागून जोरात आलेला डुकराचा लहान पिल्लू मृत्यू झाला.तेव्हा रामेश्वरही खाली पडलेल्या अवस्थेत होता. तेव्हा त्यांना काही गावातील रस्त्याने येणाऱ्या लोकांनी उचलून काही लागले आहे का असे विचारले तेवढ्यातच गावातील सामाजिक कार्यकर्ता सुरज गुप्ता व पत्रकार अतिश वटाणे यांनी कुठे कुठे लागले आहे का आहे त्यांची सर्व चौकशी केली. सुदैवाने जास्त मार नसल्याचे वृत्त दिसून आले. परंतु हाताला पायाला खर्चटलेले दिसल्यामुळे तेव्हा त्यांना ताबडतोब दवाखान्यात जायला सांगितले. घरी जाऊन दवाखान्यात गेल्यानंतर त्यावेळी हाताचे हाड टीचलेले एकायास मिळाले.ही घटना काल रात्री दहा वाजुन सात मिनिटाला घडली.त्यामूळे उमरखेड ते मेट रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकाने काळजी घेणे आवश्यक आहे.यावेळी गावातील गजानन मिराशे,बाबू डुकरे, चेतन मिराशे, दिपक भोसले उपस्थीत होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पाण्यापासूनच डुकराच्या संख्येत वाढ झाली आहे असे बाळदी, पिरंजी,कृष्णापुर गावातील लोकांकडून ऐकायला येत आहे.