महागाव नगरपंचायत ला अग्निशामक गाडी झाली शोभेची वस्तू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत ला एक वर्षांपूर्वी अग्निशामक गाडी दाखल झाली त्या गाडीवर ड्रायव्हर व अग्निशामक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी अद्याप पर्यंत न मिळाल्यामुळे अग्निशामक गाडी धुळ खात नगरपंचायत कार्यालयासमोर पडलेली आहे .महाराष्ट्र शासनाने जेवढ्या नगरपंचायत झालेले आहेत तेवढ्यांना अग्निशामक गाडी पाठवले आहे .परंतु त्या गाडीवर कोणताही कर्मचारी व ड्रायव्हर नियुक्त न झाल्यामुळे त्या गाडीचा उपयोग आग विझवण्याकरता होत नसून एकाच जागी शोभेची वस्तू झाली आहे .त्या गाडीला ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नाही खुल्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. तसेच नगर परिषद ला ट्रॅक्टर सुद्धा प्राप्त झाले आहे.पण त्याचा उपयोग कुठे होताना दिसत नाही आता पावसाळ्याचे दिवस लागले आहे पावसामध्ये गाड्या भिजत वर्षानुवर्ष एकाच जागी उभ्या असल्यामुळे तांत्रिक बिघाड सुद्धा येऊ शकते त्यामुळे महागाव नगरपंचायत ला अग्निशामक गाड्यावर प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नियुक्त होणे आवश्यक आहे .त्यावेळेस त्या गाडीचा उपयोग होऊ शकतो नाहीतर नगरपंचायतला अग्निशामक गाडी शोभेची वस्तू दिसत आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सर्व नगरपंचायत मध्ये प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी महागाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष स्वप्निल अडकिने यांनी केली आहे .