Uncategorized

दीर्घ काळाने घनकचरा टेंडर मंजूरनगरसेवक सभेत मंजुरी देतील का?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मध्ये घनकचऱ्याचे टेंडर संपून आठ महिने झाले होते महागावला कचरा डेपोचे स्वरूप आले होते जागोजाग कचऱ्याचे ढीग असताना नगरपंचायतने घनकचऱ्याच्या टेंडरला उशीर का लावला मंजुरात मार्च महिन्यात मिळाली होती परंतु सत्ताधारी नगरसेवकाने तीन महिने उशिराने टेंडर प्रक्रिया राबवून ९-६-२०२५ रोजी आलेले टेंडर ओपन करून 24% बिलो मध्ये आलेले टेंडर मंजूर करण्यात आले .त्या टेंडरला सभेमध्ये नगरसेवकाने मंजुरी दिल्याशिवाय मान्यता मिळत नाही आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले महागाव मध्ये जागोजाग कचरा डेपोचे स्वरूप आले आहे.त्यामुळे रोगराई पसरत आहे .अशा परिस्थितीत जमा झालेला कचरा नगरपंचायत उचलू शकली नाही ही मोठी शोकांतिका आहे 16 6 2025 रोजी नगरपंचायत

नगरसेवकाचे मीटिंगमध्ये हा विषय घेतलेला आहे .तेव्हा घनकचरा टेंडरला मंजुरी मिळणार असे नगरसेवकाचे मत आहे .परंतु कचरा डेपो कडे जाताना रस्ता नाही त्याचं काय ,कचरा उचलून कचरा डेपो मध्ये नेऊन टाकने ही मोठी प्रक्रिया नाही आहे.तरीही कोणत्याही नगरसेवकाने हिम्मत न दाखवता कचऱ्याचे ढीग शासकीय कार्यालय व्यापाऱ्यांच्या मेन लाईन मध्ये बँकेजवळ व गल्लो गल्लीत मोठ्या प्रमाणात पडू आहे.त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे .गावातील नागरिक या कचऱ्याला कंटाळले असून महागाव शहरांमध्ये नगरपंचायतचे प्रशासन आहे किंवा नाही अशा शंका व्यक्त करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!