उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया सभापती कृष्णा पाटील देवसरकर तर उपाध्यक्ष श्रीपाल आडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:- दि. 31 मे रोजी पार पडलेल्या उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतभाजपा प्रणित वसंतराव नाईक सहकारी पॅनलने 18 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले बहुमत सिद्ध केल्याने आज दि 11 जून रोजी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत कृष्णा पाटील देवसरकर यांना 18 पैकी 11 मते तर उपसभापती पदासाठी श्रीपाल आडे यांनाही 18 पैकी 11 मते मिळवून निवड होऊन सत्ता काबीज करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दि 11 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार पहूकर यांनी सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रीया पार पाडली सभापती पदासाठी भाजपा प्रणित पॅनेलचे कृष्णा पाटील देवसरकर तर कॉग्रेस प्रणित शेतकरी सहकारी पॅनलचे प्रविण पाटील मिरासे या दोघांनी नामांकन दाखल केले होते यामध्ये कृष्णा पाटील देवसरकर यांना 18 पैकी 11 मते मिळाली तर प्रविण पाटील मिरासे यांना 18, पैकी 7 मते मिळाली. यामध्ये कृष्णा पाटील देवसरकर हे विजयी झाले तर उपसभापती पदासाठी भाजप प्रणित पॅनेलचे श्रीपाल आडे यांनी तर कॉग्रेस प्रणित पॅनलचे राजेश कवाने यांना 18, पैकी 7 मते मिळाली त्यामुळे कृष्णा पाटील देवसकर हे सभापती तर श्रीपाल आडे हे उपसभापती पदासाठी निवडूण आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्च्या निवडणुकीमुळे नुकतेच भाजपामध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी भाजपच्या अधिपत्याखाली प्रथमच आपली राजकीय इनिंग सुरू केलेली असताना त्यांना सुरुवातीलाच हे यश प्राप्त झाल्यामुळे व भाजपाने ही सहकार क्षेत्रात पाय रोवले असल्यामुळे भाजपा सह त्यांचे सहकारी पक्ष नेत्यामध्ये व कार्यकत्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले निवडीनंतर झालेल्या विजयी सभेत भाजप नेते नितिन भुतडा आमदार किसन वानखेडे, प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे डॉ विजयराव माने , यांनी विजयी सभेला संबोधित केले यावेळी प्रज्ञानंद खडसे, महेश काळेश्वरकर, भगवान अग्रवाल रमेश चव्हाण आदी नेते मंडळी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.