सन २०२५-२६ खरीप पीक कर्जवाटप आढावा सभा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:-आमदार किसनराव वानखेडे उमरखेड विधानसभा सदस्य यांनी आज दि.१०/०६/२०२५ रोजी उपविभागी कार्यालय उमरखेड येथे खरीप कर्ज वाटप संबंधाने उमरखेड तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १ शाखा, खाजगी बँक १ शाखा आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. यवतमाळ बँकेच्या ८ शाखांच्या शाखा व्यवस्थापकांची सभा घेतली आहे. सदर सभेला मा. एस.पी. मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड, व आर.यु. सुरडकर तहसिलदार उमरखेड व ओ.एम. पहुरकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उमरखेड हे उपस्थित होते.
आमदार किसनराव वानखेडे यांनी सभेत त्यांनी तालुक्यातील शेतकरी सभासदांना वेळत खरीप कर्ज वाटप करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तालुक्यातील कोणताही शेतकरी कर्ज मिळणेपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत तालुक्यातील सर्व शाखा व्यवस्थापकांना आदेशित केले. तसेच बँकेशी संलग्न इतर योजनांचा आढावा घेऊन तालुक्यात योजनेमार्फत नाविन्यपुर्ण केलेल्या कामाची पुढिल सभेत दखल घेण्यात येईल असे सुचित केले आहे. शेतकरी सभासदांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतीशी निगडीत असणारे छोटे लघुउद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दयावे. तालुक्यातील शेतकरी सभासदांना सावकाराकडे न जाऊ देता बँकेकडून कर्ज देण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु उद्योगासाठी व व्यवसायाकरीता अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे.
तसेच आमदार किसनरावजी वानखेडे यांनी दि.१०/०६/२०२५ अखेर किती कर्ज वाटप केले याचा आढावा घेतला असता खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये उमरखेड तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ या बँकेच्या एकुण ८ शाखांना एकूण ४५ ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था व ७ आदिवासी विविध सहकारी संस्था अशा एकूण ५२ सहकारी संस्था संलग्न असुन शाखांनी दिनांकः-१०/०६/२०२५ अखेर एकूण ६२७६ सभासदांना रु. ४५.७८ (४५ कोटी ७८ लाख रुपये) कर्जवाटप केले आहे व राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १ शाखा, खाजगी बँक १ शाखा यांनी दिनांकः-१०/०६/२०२५ अखेर एकुण २२८८ सभासदांना रु. ३७.७९ (३७ कोटी ७९ लाख रुपये) कर्जवाटप् केले आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील कोणताही सभासदास कर्जाबाबत काही अडचण असल्यास त्याची अडचण आपल्यास्तरावर निकाली काढण्यास सभेतील बँक व्यवस्थापकांना आदेशित केले आहे. सदर सभेला माने, जाधव, शेगेपुलेक डुकरे, देवसरकर व आलट बँकेचे व्यवस्थापक व एस.एस. पिंपरखेडे सह. अधि. २ हे हजर होते.