धारकांना येथे 50 ते 60 पाळीव जनावर धरणाच्या काठी मृत्यूमुखी धरणात वीज कोसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची शक्यता ?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वेणी अधर पुस प्रकल्पाच्या बॅक वॉटर मध्ये 50 ते 60 पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याची खळबळ जनक घटना उजेडात आली आहे. धारकान्हा परिसरातील गाय, बैल, म्हैस आणि कालवडी अशी 100 ते 130 पाळीव जनावरे चरण्यासाठी वेणी अधर पुस प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रातील गवताळ भागात गेली होती. सायंकाळी सोसाट्याचे वादळ,विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेकडो जनावरे धरणाच्या काठावर उथळ पाण्यात बसली होती. याच सुमारास धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वज्राघातामुळे पाण्यात बसलेली 50 ते 60 जनावरे मृत्युमुखी पडले असून तलाठी खोसे व गावातील नागरिक सरपंच पोलीस पाटील हे मृत्यू पडलेला जनावरांना पाण्यातून काढून बाहेर ठेवत आहे. यातील बरीच जनावरे गाळात फसलेली आहेत व 40 ते 45 जनावर गावात वापस आली आहे .त्यामुळे नेमकी वीज कोसळून या जनावरांचा मृत्यू झाला की यामागे वेगळे कारण आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आले पोस्टमार्टम झाल्यानंतर कळून येईल धारकान्हा हे गाव दुर्गम असून डोंगरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. या दुर्घटनेत 50 ते60 जनावरे मृत्युमुखी पडली अजून शोध सुरू आहे .



