महागाव तालुक्यातील वेणी येथे लोअरपूस वेणी धरण क्षेत्राच्या जवळपास दत्त मंदिराजवळ शासनाच्या ई क्लास जमिनीतून जेसीबीच्या साह्याने अवैध मुरुमाचे उत्खनन गुंज मंडळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वेणी गावात लोअर पुस वेणी धरणाच्या लगत दत्त मंदिराजवळ शासनाच्या ई क्लास जमिनीतून रात्रीच्या वेळी अवैध मुरुमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असून गुंज मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे ! शासनाच्या जमिनीमधून हजारो बरास मुरमाचे उत्खनन रात्रंदिवस होत असून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत ! गुंज मंडळ अधिकारी यांनी या आधी रात्रीच्या वेळी सदर गौण खनिज चोरास रंगेहात पकडले असता दोन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशीन सोडून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याची चर्चा वेणी गावात पसरली असून मुरुमाचे उत्खननामुळे धरण क्षेत्रातील जमिनीमध्ये मोठ मोठ्या गड्यांचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्राला सुद्धा इजा पोहोचण्याचा धोका असल्यामुळे वेणी गावातील सुज्ञ नागरिक यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करणार असल्याचे समजते . महागाव तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये शासनाच्या ई क्लास जमिनीमधून हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन होत असून महागाव तहसीलदार यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे .