Uncategorized

दिव्यांग, इतर गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिबीरात उपस्थित नागरिक व आयोजक.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड शहराच्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन व प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व इतर गरजूंसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. उमरखेड शहर व तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव व गरजू रुग्णांची सदर शिबिरात तपासणी करून औषधी वाटप करण्यात आले. यावेळी सदर शिबिराचे उद्घाटन दिव्यांग बांधव व आनंदराव मोहितवार यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. या

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गजानन सुरते, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका प्रमुख दिग्रस, प्रदीप आडे, तालुकाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष पुसद, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुकाप्रमुख बालाजी माने, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शहर प्रमुख प्रेम रुडे, अभिजीत गंधेवार, युवा जिल्हाप्रमुख यवतमाळ उपस्थित होते.

या शिबिरात डॉ. भाग्यश्री कोडगिरवार, डॉ. मनोहर वंदे, डॉ. जिवने, डॉ. सुमेगा राठोड, सुरेखा मुधोळ, रोहन त्रिपाठी, रूपाली मुलंडे व अधिक कर्मचारी व वैद्यकीय

अधिकाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!