समाजात होत असलेली लूट थांबविण्यासाठीच ग्राहक पंचायत या कार्यक्रमाचे आयोजन

ग्राहक पंचायत मध्ये सर्वांनाच न्याय मिळतो
ग्राहकपंचायतचे अध्यक्ष ॲड. विलासराव देवसरकर
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड सर्वप्रथम माणूस हा मूळचा ग्राहक असून कोणत्याही वस्तूची खरेदी करत असताना सावधान राहून वस्तूची पूर्णता पाहणी करूनच फसवल्या जाणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी असे आवाहन व ग्राहक पंचायत उमरखेड शाखेचे अध्यक्ष ॲड. विलासराव देवसरकर यांनी केले ॲड. देवसरकर हे तहसील कार्यालया यांच्या वतीने आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले
पुढे ॲड. विलासराव देवसरकर यांनी सांगितले की केवळ ग्राहकांनी दक्ष राहूनच असे सांगून मोकळे होऊन जमणार नाही तर ग्राहकांनी याबाबत पेटवून उठावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते तथापि

अधिकाऱ्यांना मात्र व्यापारी त्यांनी खरेदी केलेली वस्तू जर निकृष्ट दर्जाची अथवा खराब निघाली तर तो ताबडतोब त्यांना दुकानदार बदलून देतात मात्र गोरगरीब लोकांना विचारणा केल्यास पुढची वाट दाखवतात यावेळी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी ग्राहकांची कशा प्रकारे लूट केले जाते ते यावेळी सांगितले शेवटी ग्राहक संघटनेच्या बळामुळेच ग्राहकांना न्याय मिळतो हे त्यांनी शेवटी निक्षून सांगितले बरेच जागा फसवणूक झाल्याचे सांगत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात बरेचदा झालेला अन्याय देखील सहन करतात यासाठी ग्राहकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दाखल केल्यास ग्राहक मंचातर्फे त्यांना नुकसान भरपाई देखील मिळू शकते गॅस कंपनी वीज वितरण कार्यालय नगर परिषद मार्फत होणारा दूषित पाणीपुरवठा इत्यादी समस्यांचे समाधान प्रशासन आणि ग्राहक संघटना यांच्यामार्फत सहजपणे दूर करता येऊ शकते यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या कशा दूर करता येतील आणि सामान्य जनतेच्या शंकाचे समस्यांचे समाधान झाल्यास त्यांना योग्य न्याय मिळेल आणि ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली यावेळी ग्राहकपंचायतचे उपाध्यक्ष प्रा. प्रकाश देशमुख यांनी या जागतिक ग्राहक दिनाचे मुख्य उद्देश ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि सोशल मुक्त समाजाची निर्मिती करणे हा असतो तसेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामधील प्रमुख कलमांचे सविस्तर वर्णन केले आणि 2019 च्या कायद्यामधील नव्याने समाविष्ट केलेली कलमे आजच्या काळानुसार कशी उपयुक्त आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच सचिव यशवंत गिरी यांनी ग्राहकपंचायतीचे आजपर्यंतचे कार्य तसेच वस्तूच्या किमती व त्यामधील फरक हा ग्राहक आणि लक्षात घेतला पाहिजे असे सांगितले तर सेवानिवृत्त अधिकारी सुभाष पांडे यांनी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. त्याबद्दल त्यांचे हक्क आणि अधिकार याबाबत माहिती दिली तर तसेच प्रकाश दुधेवार ‘ दत्ता गंगासागर ‘ भारत पेट्रोलियमचे दिलीप सारडा यांनी ग्राहक म्हणून आलेला अनुभव कथन केला तर यावर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत कावरे यांनी सुरक्षितता माहितीचा अधिकार वस्तूचा भाव करण्याचा अधिकार तक्रार निवारण याबाबत ग्राहकांना पुरेपूर अधिकार असून फ्लिपकार्टच्या जाहिरातीबाबत अभिनेता अमिताभ बच्चन यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती यावेळी दिली या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत चे सर्व पदाधिकारी सदस्य व्यासपीठावर नारायण वडे ‘प्रकाश दुधेवार ‘दत्ता गंगासागर ‘ आर डी बोरगडे प्रा. प्रकाश देशमुख ‘सेवानिवृत्त अधिकारी सुभाष पांडे ‘विवेक मुडे रमेश भागवत ‘शेखर बंडेवार ‘ राजेश गांजेगावकर ( पत्रकार )तसेच अधिकारी वर्गात उतरवार रुग्णालयाचे अधीक्षक रमेश भांडण ‘सहकारी अधिकारी संजय पिंपरखेडे /विद्युत विभागाचे अभियंता श्री कांबळे यांचे सह इतर कार्यालयाचे बँकेचे अधिकारी ‘ महिला यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संदीप घाडगे आभार प्रदर्शन रवींद्र चव्हाण यांनी केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्राम गुट्टे ‘ वानखेडे संदीप घाडगे यांनी परिश्रम घेतले