Uncategorized

भाजपाच्या मर्जीतले अधिकाऱ्यांचे स्थानांतरण कराशिंदे सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड अधिकारी हे स्थानिक त्यांच्या मर्जीनुसार अधिकारी कायदा व सुव्यवस्थेता पारदर्शक नसल्यामुळे निवडणुकीत सदर कर्मचारी कर्तव्य बाजूला सारून भाजपासाठी काम करू शकतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे न.प. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी स्थानांतरण करावे, अशा आशयाचे निवेदन शहर शिंदेसेनेच्यावतिने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. न.प. निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होणार असून ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे असे अधिकारी व कर्मचारी न. प. मध्ये कार्यरत आहे. भाजप नेत्याच्या प्रभावाखाली मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे वास्तव्य नसलेल्या परिसरात विकास निधी खर्च घातला असून नागरिकांच्या मागण्या असलेल्या परिसराकडे दुर्लक्ष केले आहे. अशा आशयाचे निवेदन शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. संजीव कुमार जाधव, महिला शहर प्रमुख सपना चौधरी, कैलाश कदम, ज्योती सुरोशे, शिवकन्या सुरोशे, वंदना चव्हाण, लक्ष्मी मैड, सुनील शहाणे, राजू गायकवाड आदींनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!