Uncategorized

मोदींना आश्वासनाच्या आठवणीसाठी काँग्रेसची ‘शेतकरी आत्मसन्मान’ पदयात्रा पदयात्रेत सहभागी व्हावे साहेबराव कांबळे

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे

काँग्रेस प्रदेश समितीने ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरातून ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या पदयात्रेचे रूपांतर आर्णी बाजार समितीमध्ये शेतकरी मेळाव्यात होणार असल्याची माहिती विधानसभेचे कॉग्रेस चे नेते साहेबराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पदयात्रेचे नेतृत्व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री ॲड शिवाजीराव मोघे माणिकराव ठाकरे माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह पक्षाचे आमदार, पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होतील. २० मार्च २०१४ रोजी दाभडीमध्ये तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना १९ आश्वासने दिली होती. यानंतर मोदी पंतप्रधान झाले; परंतु यापैकी १८ आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत फक्त चर्चाच आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत, कृषी उत्पादित माल विशेषतः कापूस आणि सोयाबीनला आश्वासनानुसार भाव मिळत नाही. बँकांनी पीक कर्जाचे व्याज दर कमी केलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या मागील १० वर्षात वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली जाणार आहे. या पत्रपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन नाईक , बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे संचालक स्वप्निल नाईक , महागाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख , डॉ. अरुण पाटील ,नागोराव वराडे , कय्याम नवाब वसंतराव भुसेवाड , पुंडलिक भुरके , विनोद सोरते वसंता राठोड , विठ्ठलराव पवार, बाळासाहेब करपे बाळासाहेब येणकर महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक संभाजीराव नरवाडे , महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ . सुनंदा दिलीपराव कोपरकर , यवतमाळ जिल्हा अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे , महिला तालुकाध्यक्ष मालाताई मंगेश देशमुख , महिला शहराध्यक्ष चंदाताई पाईकराव , शहर काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मनोज अशोकराव केदार , महागाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक सुनील माधवराव भरवाडे , महागाव रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल सुभाषराव शिंदे , महागाव नगरपंचायत चे काँग्रेस पक्षाचे गटनेते , नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश कोपरकर , नगरसेवक महेश गजानन पाटील , महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई संतोष कोल्हेकर , नगरसेविका सुरेखा विनोदराव कोपरकर , महागाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक अमर पाटील नरवाडे , सुदाम कुसंगवाढ , शेख जब्बार शेख युसुफ , नाना सटवा पाटे , अभिजीत कावळे , गजानन गाडबेले , अनिरुद्ध कावळे , दत्तराव इंगळे , बंडू पाटील राऊत , शेख सत्तार , मंजूर भाई , विजय देवराव भरवाडे , गजानन कदम , सुरज धोंगडे , अक्षय कोपरकर , यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते . या कार्यक्रमाला तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते साहेबराव कांबळे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!