पोफाळी पोलीस स्टेशन ठाणेदाराच्या आशीर्वादाने बोथा व गौळ येथे शेतात अवैध पत्त्याचा सोशल क्लब जोमात सुरू ठाणेदार व बीट जमादार बघायच्या भूमिकेत! पोलीस अधीक्षक शेतामधला पत्त्याचा क्लब बंद करतील का?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सर्वात आखरीच गाव बोधा असून पोलीस स्टेशन पोफाळी हद्दीत हे गाव येत असून ऐन पेरणीच्या दिवसात शेतकरी वर्गांना बरबाद करण्याचे काम शेतामधल्या सोशल क्लबच्या माध्यमातून होत असलेले दिसून येत आहे .बोथा येथे शेतामध्ये पत्त्याचा क्लब सहा ते सात दिवसापासून खुलेआम सुरू आहे. त्या पत्त्याच्या क्लबला एलसीबी पथक पुसद व पोफळीचे ठाणेदार व जमादार यांच्या संगनमताने पत्त्याचा क्लब सुरू असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस असताना बोथा येथे खुले आम शेतात पत्त्याचा क्लब सुरू करू शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे काम सुरू आहे. लालचे पोटी आजूबाजू परिसरातील शेतकरी वर्ग व पुसद येथील आंबट शौकीन नागरिक मोठ्या प्रमाणे त्या क्लब व येत असून लाखो रुपयाची उलाढाल त्या पत्त्याच्या क्लब वर होत
आहे .शेतकरी बियाण्याचे शेताला लागणारे पैसे त्या पत्त्याच्या क्लब वर हरत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली आहे . शेतात पत्त्याचा क्लब चालवणारे हप्ते देऊन सुरू आहे आमचे कोणी काही करू शकत नाही त्या शेतामधल्या पत्त्याच्या क्लब वर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी तातडीची कारवाई करून पत्त्याचा क्लब बंद करून अधिकाऱ्यावर व पत्त्याच्या क्लब धारकावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.