लोकनेते मनोहरराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस आणखी किती वाट पहावी लागणार ?

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंदाजे दोन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती दीपक आडे यांनी लोकनेते मनोहरराव नाईक यांचा पुतळा महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बसविण्याचे ठरविले ! तालुक्यातील अनेक संस्थांचे पुढारी , सरपंच , शेतकरी यांना बोलावून एक विचार बैठक आयोजित करून पुतळा बसविण्याचे ठरले .महागाव तालुक्यातील शिष्टमंडळाने मनोहराव नाईक यांची भेट घेऊन पुतळा बसविण्यासाठी त्यांची परवानगी मागितली असता त्यांनी नकार दिला ! परंतु काही जाणकार नेते मंडळीने मनोहरराव नाईक यांचे मन वळवीत आपले सहकार क्षेत्रात योगदान असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर होकार द्यावा त्यांनी परवानगी दिल्यानंतर निधीची तडजोड करण्यासाठी प्रा . शिवाजीराव राठोड संचालक यवतमाळ जिल्हा सहकारी बँक , साहेबराव पाटील हिवरेकर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तत्कालीन सभापती दीपक आडे यांनी महागाव तालुक्यातून निधी जमा करण्यास सुरुवात केली मोठ्या प्रमाणावर निधी जमाही झाला ! परंतु मध्यंतरी एखादी मीटिंग बोलावून पुतळा बसविण्याबाबत चर्चा विचार बैठक आयोजित करून निधी किती जमा झाला पुतळ्याची किंमत किती ? पुतळा कुठे बनवण्यास दिला ? पुतळा निर्मात्याला ॲडव्हान्स किती दिला ! बाकी रक्कम किती देणे आहे ! बाकी रक्कम देऊन पुतळा किती दिवसात बसविणार हे तालुक्यातील सढळ हाताने निधी दिलेल्या मनोहरराव नाईक यांच्या चाहत्यांना समजले पाहिजे ! संबंधितांनी एका आठवड्याच्या आत एका बैठक घेऊन पुतळा किती दिवसानंतर बसविणार त्याची कल्पना तालुक्यातील मनोहर नाईक चाहत्यांना द्यावी . काही अडचणी समोर येत असल्यास चर्चा करा असा सल्ला दौलतराव नाईक , पंजाबराव खडकेकर यांनी देत पुढाकार घेऊ तांत्रिक अडचणी येत असल्यास एकत्र बसून चर्चा करू व पुतळा बसविण्यास मदत करू असे मत प्रतिनिधी जवळ व्यक्त केले . निधी जमा करण्यासाठी जेवढी धावपळ केली तेवढीच धावपळ पुतळा बसविण्यासाठी नेत्यांनी करावी आपला अमूल्य वेळ यासाठी देऊन एकदाचा पुतळा नियोजित जागी स्थानापन्न करावा अशी महागाव तालुक्यातील जनमानसाची भावना आहे .