Uncategorized

दिव्यांग धोरण 2018 नुसार राखीव निधी मिळण्यासाठी प्रहार चे लोटांगण आंदोलन

विजांच्या कडकडाटासह भर पावसात चार तास थरारक आंदोलन.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

  उमरखेड :-   सन 2018 ते 2025 पर्यंत दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5% टक्के निधी हा दिव्यांग धोरण 2018 नुसार नगरपरिषदेच्या स्वउत्पन्नाच्या पाच टक्के वितरित करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने नगरपरिषदेच्या विरोधात वरून विजांच्या कडकडाटासह धो धो बरसणाऱ्या  मुसळधार पावसामध्ये सलग चार तास लोटांगण आंदोलन करण्यात आले.
    दिव्यांग व्यक्तीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 18 मधील परिशिष्ट अ मध्ये 16 (१) पाच टक्के अंदाजपत्रकाच्या उपायोग/विनियोग नुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निधीमधून कमीत कमी पाच टक्के इतका निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवेल ह्यानुसार 2018 पासूनचा नगरपरिषदेने आपल्या उत्पादनाच्या पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्चित करावा. अशी तरतूद दिव्यांग धोरण 2018 मधील परिपत्रकात शासनाकडून करण्यात  करण्यात आली असताना सुद्धा नगरपरिषद मात्र आम्ही ह्या वर्षी इतकी तरतूद केली. तितकी तरतूद केली अशी उत्तरे देऊन दिव्यांग बांधवांना तुटपुंजी रक्कम वाटप करून दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे नगर परिषदेकडून दिव्यांगांची दिशाभूल  करण्याचे काम करत आहे.
   सदर निधी दिव्यांग धोरण 2018 नुसार मिळण्यासाठी गेल्या चार वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक आंदोलनाच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाकडे विनवणी करण्यात आली. उमरखेड शहरातील जवळपास सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनात सदर निधीच्या मागणीसाठी बैठका पार पडल्या परंतु निर्लज्ज असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी सदर दिव्यांगांचा निधी दिव्यांग धोरण 2018 नुसार अद्यापही वाटप न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्ते आक्रमक होत. संजय गांधी चौक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत लोटांगण घालत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना साष्टांग नमस्कार करून आमचा निधी आम्हाला देण्याची हाक दिव्यांग बांधवांनी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. सदर आंदोलनाची दखल नगर परिषदेकडून घेण्यात आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी सदर कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. शहर प्रमुख राहुल मोहितवार, तालुका प्रमुख सय्यद माजिद, तालुकाप्रमुख रवी जाधव, तालुका प्रमुख प्रदीप आडे, शहर सचिव शाम चेके, प्रजेश खंदारे,रघुनाथ खंदारे, प्रेम रुडे, इरफान, वैध, नेमीचंद चव्हाण, यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

चौकट-
नगरपरिषदेचे वार्षिक उत्पादनाच्या पाच निधी दिव्यांगांना मिळाला पाहिजे- मोहितवार
उमरखेड नगर पालिकेचे वार्षिक उत्पन्न जवळपास साडेतीन कोटीच्या आसपास आहे. त्यानुसार साडे तीन कोटीचे पाच टक्के म्हणजेच साडे सतरा लाख रुपये हे वर्षाकाठी दिव्यांग बांधवांना मिळायला पाहिजे. असे दिव्यांग धोरण 2018 मध्ये तरतूद शासनाने केली आहे. त्या शासनाच्या परिपत्रका विरोधात नगर परिषद मुख्याधिकारी हे चुकीच्या पद्धतीने नियम लावून दिव्यांगांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्यामुळे अशा मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून 2018 ते आजपर्यंतचा दिव्यांग निधी त्वरित वाटप करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी दिला.

      "चौकट "

काही काळ नगर परिषद परिसरात तनावाचे वातावरण
मुख्याधिकाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उशीर लागत असल्याने आंदोलन करते राहुल मोहितवार यांची तब्येत बिघडत जात असल्याने काही आंदोलन आक्रमक होत. नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढले त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपरिषद कार्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढल्यामुळे छावणीचे रूप आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!