Uncategorized

पुणे येथील शिल्पकाराचा उपोषणाचा इशारा तीन वर्षांपासून अश्वारुढ पुतळ्याचे बील थकीत !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : तीन वर्षांपूर्वी येथील नगर परिषदेने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पुणे येथील अल्हाट आर्ट स्टुडिओ ला काम दिले होते. पुतळा देऊन तीन वर्षे लोटल्यानंतरही उर्वरित १८ लाख रुपये नगरपरिषदेने अद्यापही दिले नसल्याने संबंधित कंपनीकडून कामगारासहित आझाद मैदान मुंबई येथे १९ मे पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.उमरखेड नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळ्याचे काम २ मार्च २०२० रोजी ऑर्डर मिळालेनंतर (कोव्हीड-१९) हा आजार भारत देशात आला होता. त्यामुळे पूर्ण भारत देश व बाजारपेठा बंद झाल्या होत्या. तरी आल्हाट आर्ट स्टुडिओने आजाराची व भरण्याची भिती न बाळगता १९ जुलै २०२१ रोजी काम पुर्ण करून दिलेले आहे. त्याचवेळी त्यांनी बिल ही दिलेले होते. त्यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले की, पुतळ्याचे बिलाचे पैसे
बाजुला ठेवले, पुतळा पोहोच करा. बिल ताबडतोब मिळेल. परंतु पुतळा पोहोच केले. नंतर ३ वर्षे पूर्ण झाले. थकीत बिल मिळण्यासाठी शिल्पकार सुभाष अल्हाट उपोषणास बसले होते. त्यावेळी सी.ई.ओ. यांनी ३० दिवसांच्या आत पेमेंट आरटीजीएस करु, तुम्हास इकडे येण्याची काही गरज नाही, असे आश्वासन दिले होते.

आता १० महिने होवून गेले. अद्याप पेमेंट देण्यात आले नाही. २४ एप्रिल रोजी सी.ई.ओ. यांना पुन्हा अल्हाट भेटले असता त्यांनी सांगितले की, तुमचे पेमेंट लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने परत घेतले. तरी पुढील फंड येईपर्यंत आपणांस पेमेंट भेटणार नाही. पुतळा देवून ४ वर्षे झाले. तरीही आल्हाट यांना पेमेंट न मिळाल्याने कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आम्ही १९ मे २०२५ मंत्रालय, मुंबई येथे निर्देशित केलेल्या ठिकाणी आझाद मैदान येथे नाईलाजास्तव मी व माझे कामगार उपोषणास नाईलाजास्तव बसत आहोत असे आल्हाट यांनी निवेदन देत इशारा दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!