Uncategorized

नियम धाब्यावर बसवून काम सुरू रस्त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह नगरपरिषदेचा निकृष्ट कामाचा धडाका

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड येथील महागाव रस्त्या लगत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने खरेदी ऑफिस कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. जुन्या रस्त्यावर कुठलेही खोदकाम, लेवल व स्वच्छता न करता डांबर टाकून कोट मारून, काम निपटवण्याचा प्रकार, दिवसा ढवळ्या केल्या जात असून, काम निकृष्ट होत असल्याची स्थानिकांची ओरड, दुर्लक्ष केल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

नगरपरिषद हद्दीमध्ये सध्या विविध कामांचा सपाटा सुरू आहे. करोडो रुपयांच्या कामांमध्ये मात्र नियमांचा पोबारा उडालेला बघायला मिळत आहे. शहरातील जुन्या भागात व वाढीवस्तीत सुरू असलेल्या कामांमध्ये जेमतेम हीच पद्धत वापरली जात आहे. महागाव रस्त्यावरील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्या चे काम एक महिन्यापूर्वी सुरू झाले होते. कुठले खोदकाम व साफसफाई न करता डांबर मारणे सुरू असताना स्थानिकांनी काम रोखले होते. मात्र महिन्याभराच्या अवकाशाने पुन्हा त्याच पद्धतीने निकृष्ट काम करण्याचा सपाटा नगरपरिषद व संबंधित ठेकेदारांकडून अवलंबविला जात आहे. नियमानुसार रस्त्याचे काम होत नसेल, चालू रस्त्यावर डांबर टाकून खडीकरनाचा कोट मारला जात आहे.
याबाबत रस्त्यावरील व्यापारी व स्थानिकांनी ओरड सुरू केली असून, नगरपरिषदेच्या अभियंतांना काम व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्या डावलून अभियंता व ठेकेदार यांच्या मिलीभगतीने निकृष्ट कामाचा धडाका सुरू ठेवण्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत स्थानिकांनी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंत ही माहिती पोहोचविली होती. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची काळजी न घेता, कंत्राटदाराने कोणत्याही हालतीत हा रस्ता पूर्ण करण्याचा चंग बांधल्याने, या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!