चातारी येथे बालरोग निदान शिबिर संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
चातारी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित बालरोग निदान शिबिर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन सुखकर्ता हॉस्पिटल उमरखेड येथील डॉ मंगेश नरवाडे आणि दत्त क्लिनिकचे डॉ जयकुमार माने यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26.04.2025 ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्त तपासणी मध्ये 50 टक्के सूट देण्यात आली आणि सर्व बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. सोबतच माजी सरपंच अश्विन माने यांचे सौजन्याने मोफत औषधी वाटप करण्यात आले. शिबिरात एकूण 80 बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. यावेळी बालरोग तज्ञ डॉ मंगेश नरवाडे, डॉ जयकुमार माने, गजानन माने (शंकर मेडिकल), अश्विन माने , संजय माने, अंकूश धात्रक, सय्यद खयुम, सय्यद खदिर, शिवाजी वानखेडे, विलास वानखेडे, समाधान भवर, सय्यद जमीर, अभिजित माने तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.