पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा निषेध शिवसेनेच्या वतीने शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड ;-जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना दि .22 रोजी पहलगाम येथे निरपराध 26 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून गोळ्या झाडल्या पर्यटकांना शिवसेनेच्या वतीने दि 24 रोजी येथील माहेश्वरी चौकात श्रद्धांजली अर्पण करत दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .
तसेच त्या दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी च्यां मुर्दाबाद घोषणा देत पुतळ्याचे दहन करण्यात आले .
याप्रसंगी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड काका,विशाल भैय्या , तालुका प्रमुख संतोष जाधव , युवासेना शहर प्रमुख जस्विन घनघाव यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करून शहीद पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते रविकांत रुडे,माजी नप सभापती संदिप ठाकरे , माजी शहर प्रमुख अतुल मैड,युवा सेना तालुका प्रमुख विनायक मरोडकर,युवा सेना उपशहर प्रमुख अनिल ठाकरे , विजय पांडे,अनंतराज अमृते,अभिजीत देशमाने,गोवर्धन गावंडे,शंकर नरवाडे,आकाश जेवे, अंकुश खाडे,शुभम चोरघडे,रोहित गालफाडे,विनोद मिटकरे, बंडूभाऊ चिंचोलकर, प्रकाश कल्याणकर,अतुल उदावंत, काना जाधव,सौरव कबले,उदय गावंडे,अनिकेत खंदारे,अक्षय शिरफुले, परमेश्वर आऐवले,भगवानराव गावंडे,गंगात्रे बंधू,प्रशांत मोरे,वसंतराव देशमुख सह शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते .