जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांच्या हस्ते उबाठा सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : -विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता उबाठा शिवसेनेची नव्या जोमाने तालुका कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली असून त्यामध्ये पक्ष वाढीसाठी कार्यक्षम असलेल्या युवकांना संधी मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांच्या हस्ते दि. 8 एप्रील रोजी ढाणकी येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे .
यामध्ये नवनिर्वाचित उमरखेड शहर अध्यक्ष अमोल नरवाडे, ढाणकी शहर अध्यक्ष कांता वासमवार,संघटक शिवा फाळके ,संपर्कप्रमुख गजानन आजेगावकर ,समन्वयक शिवाजी मदडे आदी पदाधिकाऱ्यांचा ढाणकी येथे वासमवार यांच्या निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या झालेल्या बैठकीत सत्कार करण्यात आला .यावेळी माजी तालुकाप्रमुख संजय कुंभरवाड ,उपजिल्हाप्रमुख नितीन शिंदे,युवा सेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर ,विधानसभा संघटक प्रशांत जोशी,माजी शहराध्यक्ष बंटी जाधव,विजय वैद्य ,अनिल कांबळे ,दयानंद महाजन ,सतीश पवार,अभय सोनुने यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे .