शिवाजी च्या विद्यार्थ्याचे ( MTS) परीक्षेत सुयश

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- दि.19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र प्रतिभा शोध परीक्षा (MTS) महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षे चा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री शिवाजी विद्यालय चातारी येथिल प्रतिभावान व उपजत बुद्धीवान विद्यार्थी युवराज संभाजी वानखेडे (वर्ग 6 वा गटातून ) यवतमाळ जिल्ह्यातून द्वितीय तर महाराष्ट्रातून 18 वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात येणारी (NMMS EXAM) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्री शिवाजी विद्यालय येथून दहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले, परीक्षे मध्ये साक्षी संभाजी वानखेडे हिचा यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक तर सानवी मारोती माने या विद्यार्थिनी चा जिल्ह्यातून दुसरी क्रमांक आला असल्यामुळे आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत प्राविण्य मिळून निवड झालेला विद्यार्थी सोहम राजू गावंडे अशा सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक खोकले व समस्त शिक्षक वृंद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्व शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे व नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थी आणि मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे कौतुक करून संस्थेचे मार्गदर्शक आणि माजी आमदार विजय पाटील चोंढीकर , संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, विद्यालयाचे चेअरमन व कृषी शास्त्रज्ञ डॉ . विजयराव माने, ॲड. अर्चनाताई माने यांनी आनंद व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले.
चौकट :
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साक्षी संभाजी वानखेडे यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक तर सानवी बालाजी माने या विद्यार्थिनीचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आलेला आहे हे विशेष .
चौकट : महाराष्ट्र प्रतिभा शोध (MTS) परीक्षेत युवराज संभाजी वानखेडे यवतमाळ जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक तर संपूर्ण राज्यातून अठरावा क्रमांक प्राप्त