भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा ” ” जय श्रीराम ‘ च्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली

पंजाब येथील खालसा पथकांच्या चित्तथरारक कसरतीने रामभक्तांची डोळयांची पारणे फेडली
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- शहरात सकाळपासूनच श्रीरामाच्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली असून सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिरात आरती करून श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव समितीने शहरात सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत प्रभू श्री रामचंद्र व सीता रथातून, प्रभू रामचंद्राचे शिष्य श्री हनुमान,शिवशंकर श्री रामाच्या दरबारातले दृश्य अशा विविध झाँकीच्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन शहरातील श्री राम भक्तांना देण्यात आले . तर ‘ भारत का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा ” या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला होता .
माहेश्वरी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक,खडकपुरा चौक इत्यादी ठिकाणावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध सामाजिक संघटनेने मिरवणुकीतील रामभक्त साठी पाणी व खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती.

तर सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने वसंत नगर येथील श्रीराम मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सुद्धा विविध प्रकारच्या झाँकी व पंजाब येथून आलेले खालसापथक विशेष ठरले शहरातील चौका चौकात खालसापथकाने विविध प्रकारच्या कसरती राम भक्तांना दाखवल्या हे पथक पाहण्यासाठी शहरातील व तालुक्यातील रामभक्तांनी गर्दी केली. डिजे च्या आवाजात आसमंत दणदणून जात होता . मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .यावेळी शोभायात्रेत नितिन भुतडा, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाणे, संदीप ठाकरे, श्रीनाथ उल्लंगवार, सुनील टाक, महेश काळेश्वरकर, अजय बेदरकर पुंडलीक कुबडे, प्रदीप शेरे, पवन मेंढे, अँड संजय जाधव , सार्वजानिक श्रीराम जन्मोत्सवाचे अध्यक्ष महेश आलट, तातु देशमुख, राम देवसरकर , गोपाल अग्रवाल,

साहेबराव कांबळे, सिद्धेश्वर जगताप देवा इंगोले आकाश हिंगाडे ( नायडू ) ईश्वर गोसावी, शिवसेना उभाटाचे सर्व पदाधिकारी, राहूल सोनुले, अमोल नरवाडे सह सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह मोठ्या प्रमाणात प्रचंड जनसमुदाय सहभागी होता