Uncategorized

शिवसेनेने अण्णाभाऊ साठे नगरात साजरी केली रामनवमी समाजाच्या माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदाराचे दुर्लक्ष्य

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

माजी नगरसेविका स्वर्गीय कविताताई मारोडकर यांनी काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न सोडविल्याचा भावनिक उल्लेख

शहरातील अविकसीत अण्णाभाऊ साठे नगरातील समस्यांना सोडविण्यासाठी महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी प्राधान्य क्रमाने आंदोलन करणार

महिला उपशहर प्रमुख ज्योतीताई जोगदंड यांनी साठे नगर येथे राम नवमीचा कार्यक्रम आयोजित केला होता . शहर प्रमुख ॲड . संजिवकुमार जाधव यांच्या सुचनेनुसार या कार्यक्रमात गेलो असता स्थानिक स्त्री – पुरुषांनी नगरातील असुवेधाचा पाढाच वाचला
नानाविध समस्येंने ग्रस्त अन् त्रस्त असलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नच नव्हे तर वेळ प्रसंगी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा मानस महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी व उपशहर प्रमुख सारीका ताई कोकाडे यांनी व्यक्त केला या प्रसंगी उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर व प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून साठे नगर वासियांचे आभार मानले
प्रसिद्धी प्रमुख
राजु गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!