शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांच्या कार्याचा सन्मान

राम नवमीचे औचित्य साधत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड दि. ३ एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळ येथिल कार्यक्रमासाठी, उमरखेड उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांनी शहरातील तब्बल ४५ महिलांना शिवसेनेच्या शिव कार्याची महती पटवून देत त्यांना बसने यवतमाळ येथे शिंदे यांचे विचार ऐकण्यास आणले होते. आणलेल्या महिलांची ने -आण करत असतांना त्यांची जेवणाची , नाश्त्याची, पाण्याची फलाहाराची व्यवस्था सुद्धा केली होती. एकनाथ शिंदे यांचे परिवर्तनीय विचार ऐकुन महिलांनी ज्योतीताईचे आभार मानले.
यवतमाळ महिला जिल्हा संपर्क प्रमुख कालिंदाताई पवार व महिला जिल्हा प्रमुख वैशालीताई मसाळ यांचे प्रेरणेने व उमरखेड शहर प्रमुख अॅड संजिवकुमार जाधव, महिला शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे ध्येय धोरणे महिलांना समजावून सांगत पक्षवाढीचे कार्य करत तब्बल ४५ महिलांना यवतमाळ येथे बसने आणणाऱ्या कार्यतत्पर अशा ज्योतीताईचा साडी चोळी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .या प्रसंगी शहर प्रमुख अॅड संजिवकुमार जाधव, महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी, महिला संघटिका संगिताताई धाबे, शिवकन्या सुरोशे, अनुसुचित जाती सेलचे प्रमुख अॅड अजय पाईकराव, मा. उप जिल्हा प्रमुख कैलास कदम, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर व दामोदर इंगोले, वसंत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड यांचेसह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.