उन्हाळ्यात पक्षासाठी पाणपोईची व्यवस्था महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

शेख मुजाहिद ससंपादक मो.77983066192
उमरखेड : वैश्विक विकास संस्था मुळावा द्वारा संचालित महाराष्ट्र इंग्लिश स्कूल च्या विद्याथ्यांनी आपल्या जैव विविधतेचे संरक्षण करण्यासाठी उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्यावाचून पक्षाची भटकंती होवू नये त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शाळेच्या परिसरात मातीच्या भांड्याची व्यवस्थाकरून पाणी थंड राहावे यासाठी झाडांना लटकवण्यात आले. यातून पक्ष्यांच्या थंड पाण्याची व्यवस्था होत आहे.

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे आहे, कारण उष्णतेमुळे त्यांचे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी उपलब्ध
करून देण्याचे फायदे म्हणजे डिहायड्रेशन टाळणे उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पक्ष्यांचे शरीर जलद गतीने निर्जलित होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाण्याचे नि योग्य स्रोत उपलब्ध करून दिल्यास हे टाळता येते सोबतच तापमान नियंत्रित करणे म्हणजे पाणी

पिऊन पक्षी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांना उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारा त्रास कमी होतो आणि पक्षांना उन्हाळ्यात जास्त ऊर्जा खर्च के करावी लागते त्यामुळे पाणी पिऊन ते आपली ऊर्जा टिकवून ठेवू शकतात आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे

ते विविध आजारांपासून दूर राहतात सदर उपक्रम वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आला आहे.