सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती खीर वाटप करून साजरी

सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड (दि. २४ मे) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध (वैशाखी पौर्णिमा) यांची जयंती खीर वाटप करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता भगवान गौतम बुद्ध, महान राजे सम्राट अशोक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थितांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी आणि हिराबाई दिवेकर माजी (नगरसेविका उमरखेड) यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर लगेच पंचशील ध्वजगीत उपस्थित सर्व महिला मंडळींनी सादर केल्यानंतर भदंत कीर्ती बोधी यांनी या वैशाखी पौर्णिमेचे तथागतांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
भगवान बुद्धांचा जन्म याच महिन्यात झाला होता.
बोधगया येथील बोधीवृक्षावर कठोर तपश्चर्या केल्यावर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.
आणि वयाच्या ८० व्या वर्षी गौतम बुद्धांनी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे महापरिनिर्वाण प्राप्त केले होते.
म्हणून बौद्ध धम्मामध्ये वैशाख पौर्णिमेला फार जास्त महत्त्व दिले जाते. असे प्रवचन भदंत कीर्ती बोधी यांनी यावेळी केले.
रात्री ८ वाजता खीर वाटपाचा कार्यक्रम करून बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती गीत गायन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र मानकर जिल्हाध्यक्ष (रिपाई आठवले गट), सिद्धार्थ बरडे तालुका अध्यक्ष (रिपाई आठवले गट) यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन रमामाता महिला मंडळ यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर प्रफुल दिवेकर यांनी मानले.

यावेळी उषाताई इंगोले, अध्यक्ष रमामाता महिला मंडळ, मधुबाई दिवेकर, सुनिता दिवेकर, शांताबाई दिवेकर जिजाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, यशोधरा धबाले, भारताबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले,आनंदाबाई दिवेकर,शांताबाई दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, उज्वला धबाले, कांचन दिवेकर, राखी धबाले, नंदाबाई दिवेकर, सिद्धार्थ दिवेकर,प्रफुल दिवेकर, संतोष इंगोले, तुषार पाईकराव तसेच सर्व पालक पालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.