जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची धानोरा गावाला भेट

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
जिल्हाधिकारी डॉ पंकज
आशिया यांनी उमरखेड तालुक्यातील धानोरा साचलगाव येथे पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या विकास कामाची 12 जून 2024 रोजी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, एपीओ जय राठोड, पी टी ओ विजय जाधव गावचे सरपंच प्रकाश जाधव, रोजगार सेवक दत्ता कदम हजर होते. रोजगार हमी योजना ही योजना नसून तो कायदा आहे. शेतकऱ्याच्या व मजुरांच्या जिवनात समृद्धी आणण्यासाठी रोजगार हमी योजना ही नवसंजीवनी ठरत

आहे. जोडधंदा म्हणून शेतकऱ्याच्या शेतात तुती लागवड करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी साचलगाव धानोरा येथील 15 ते 20 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तुती लागवड करून आधुनिक शेतीकडे वळल्याचे यावेळी दिसून आले. वैयक्तिक लाभाची योजना, नवीन सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती ओलीता खाली आणण्यासाठी दहा ते बारा शेतकऱ्यांनी वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ घेतला व ती कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी उमरखेड तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी कामाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तुती लागवड, सिंचन विहीर व जनावरांचा गोठा इत्यादी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत तीस ते पस्तीस वैयक्तिक लाभाच्या कामे सुरू असल्यामुळे येथील 200 मजुरांना हक्काची मजुरी मिळत आहे. मागेल

त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम हे मग्रारोयोचे ब्रीद वाक्य असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी धानोरा साचलगाव येथे होत असल्याचे या वेळी दिसून आले.