दिव्यांगाच्या न्यायासाठी सर्वतोपरी लढू – रिपब्लिकन सेना

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
दिव्यांग व्यक्तीचा गौण खजिन वाहतुकीकरीताचा वापरण्यात येणारा टिप्पर वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांनी ३ फेब्रुवारी रोजी नेट शिवारात एम एच २७ सी ०५२० क्रमांक अंदाजे १८ ते २० लाख रुपये किमतीचे वाहन कुठलीही चौकशी व दस्ताऐवजाचा पंचनामा न करता सदर वाहनाची रॉयल्टी परवाना असतानाही वाहन जप्त करून नागापूर वनडेपो मध्ये लावण्यात आले. ढाणकी येथील वाहन मालक शंकर पिराजी हरकरे यांनी गयावया केली मात्र तडजोडी नकार दिल्याने व काही दिवसांनी गाडी सोडविण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दंड भरण्याकरिता जेव्हा हरकरे हे आर. एफ. ओ. कडे गेले असता, त्यावेळी वनाधिकारी यांच्याकडून सदर वाहन चोरी गेल्याची माहिती हरकरे यांना देण्यात आली.
आज रोजी दोन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा आणि उपोषणकर्ते हे आठ दिवसापासून यवतमाळ येथील वनसंरक्षक यांच्या दालनासमोर उपोषण करीत असताना वनविभागाच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून साधी दखल घेण्यात आली नाही, त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ हे उपोषण मंडपाला भेट देऊन वनविभागाचा जाहीर निषेध नोंदवून जोपर्यंत सदर प्रकरणातील दोषी अधिकारी तथा कर्मचारी यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन सेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढण्यात येतील व पीडितांना न्याय मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नगरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे, तालुका सरचिटणीस साहेबराव कदम, साई पाटील, नंदू इटकरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते