भाविक भगत शिल्प फाउंडेशन च्या वतीने मार्गदर्शन शिबिर

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : उमरखेड येथे भाविक भगत फाउंडेशन च्या वतीने रोजगार व्यवसाय निर्मितीसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी मेळावा घेण्यात आला येणाऱ्या काळामध्ये हिंगोली येथे स्किल इंडियाच्या माध्यमातून कार्यशाळेचा उद्घाटन करणार असल्याचे मत हिंगोली लोकसभेचे भावी खासदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये उमरखेड या ठिकाणी सुद्धा स्किल सेंटरची उभारणी आणि गरजवंतांना मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे मत व्यक्त केले.यवतमाळ जिल्ह्यातील महिलांसाठी हळद पावडर बनवणे मसाले पदार्थ बनवणे यासारखे अनेक पदार्थ बनण्यासाठी बँकेकडून अर्थसहाय्य भाविक भगत हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करत असल्याचे भाविक भगत यांनी व्यक्त केले हेल्प फाउंडेशन च्या वतीने मदत करण्यात येत आहे या कार्याबद्दल भाविक भगत यांचे कौतुक श्रीकांत पाटील यांनी केल. भाविक भगत हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांची २४ तास तात्पर्तने सेवा करतात या सेवेबद्दल भाविक भगर यांचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उटी गावचे सरपंच पंजाबराव वानखेडे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रीता श्रीकांत पाटील श्रीकांत पाटील चंद्रवंशी हे होते त्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेल्प फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष अनुप शेखावत यांनी केले