Uncategorized
अंबोडा येथे रॉयल्टी न भरता ३० ब्रास मुरूम टाकल्याचा आरोप; नागरिकांकडून चौकशीची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
अंबोडा येथे ग्रामपंचायतीच्या कामासाठी शासनाची रॉयल्टी न भरता सुमारे ३० ब्रास मुरूम टाकण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून ग्रामसेवकांकडे असल्याने, अशा प्रकारची कथित बेकायदेशीर बाब कशी घडली, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. शासनाची रॉयल्टी न भरता मुरूम टाकण्यात आला असल्यास त्याची रक्कम संबंधित अधिकारी अथवा ग्रामसेवक भरणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
या प्रकरणाची महसूल विभागाने चौकशी करून सत्यस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



