Uncategorized

महागाव तालुक्यात राहुर शिरफुरी ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; सचिनभाऊ नाईक यांनी केली पाहणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात २९ जून २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून शेतजमिनी खरडून निघाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ नाईक यांनी राहुर येथे तातडीने बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी मा. सचिनभाऊ नाईक यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. कोणताही हलगर्जीपणा न करता प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करून शासनाची मदत लवकरात लवकर मिळवून द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाहणी दौऱ्यादरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले.
“शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,” अशी ग्वाही मा. सचिनभाऊ नाईक यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button