उमरखेड-ढाणकी-ब्रह्मणगाव- विडुळ-हळदडा मार्गाची दुरवस्था; जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
उमरखेड मतदारसंघातील महत्त्वाचा समजला जाणारा उमरखेड-ढाणकी-ब्रह्मणगाव-विरूळ चातारी-हरदळा हा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना अक्षरशः चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरातील पुढारी उंबरखेड मतदार संघावर राज्य करतात मग अशी परिस्थिती कशी
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः हळदडा फाट्याजवळील परिस्थिती गंभीर बनली असून अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना संबंधित लोकप्रतिनिधींनी ठेकेदारांना काम वेळेत पूर्ण करण्याबाबत तंबी का दिली नाही, असा सवाल मतदारसंघातील नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच टक्केवारीच्या राजकारणामुळे विकासकामांची गुणवत्ता खालावल्याचा आरोपही काही नागरिकांकडून केला जात आहे.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.



