Uncategorized

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या

उपस्थितीत प्रचारार्थ सभा मोठ्या उत्साहात पार पडली

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, ९ नोव्हेंबर

राज्याला दीर्घकालीन विकासाचे व्हिजन देण्यासाठी व महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आराखडा तयार केला

आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना बाजूला सारून जागरूक व तरुण युवकांनी मनसेला सत्तेत बसवावे म्हणजे महाराष्ट्राचे विकास व्हिजन स्वप्न पूर्णत्वास येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

शनिवारी मनसे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या उमरखेड येथील जिल्हा परिषद पटांगणावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. तब्बल दोन तास उशिराने पोहोचलेले राज ठाकरे यांनी सरळ व्यासपीठावर येत भाषणाला सुरुवात केली.
सभेला आनंद एम्बडवार, देवा शिवरामवर, अभय गडम, देवीदास शहाणे, सादिक शेख, संजय बिजोरे, अमोल जगताप, पुसदचे उमेदवार अश्विन जयस्वाल, मोटेसिंघ जहागीरदार,

कृष्णराव नरवाडे, सुधा ठाकूर, संगीता घोडमारे, अभिजित नानवटकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!