शहर

पोलीस स्टेशन बिटरगांव हददीत ०१ महीन्यापुर्वी मिळून आलेल्या खुनाच्या गुन्हयातील कुजलेल्या अनोळखी मृतकाची ओळख पटवून गुन्हा आणला उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड :- दिनांक 09/01/2025 रोजी 10/45 वा पुर्वी, मौजे मुरली गाव शिवारातील पैनगंगा नदी पात्रात सहस्त्रकुंड धबधबा कोल्हापुरी बंधा-यात एक अनोळखी 30 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुष यास कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी अज्ञात कारणाने त्यास जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इरादयाने त्याचे प्रेत पिवळया रंगाच्या फारीमध्ये बांधून टाकून दिलेल्या स्थितीत आढळुन आले वरुन पोलीस स्टेशन बिटरगांव अप.क्रमांक 02/2026 कलम 103, 238 भान्यास प्रमाणे दिनांक 09/01/2026 रोजी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.

गुन्हयातील अनोळखी पुरुषाचे प्रेत अत्यंत कुजलेल्या स्थितीत मिळून आल्याने ओळख स्पष्ट होण्याचे दृष्टीने कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मृतकाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणने करीता आदेशीत केले होते. त्यावरुन पो.नि. स्था.गु.शा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी अंमलदार यांची चार वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयाची तात्काळ उकल करण्याचे प्रयत्न सुरु केले होते.

स्था गु.शा कडील पथकांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून बारकाईने पाहणी करुन मृतकाची ओळख उघड करण्याचे दृष्टीने पुरावा मिळुन येतो काय? याबाबत तपास केला परंतु मृतकाचे अंगावरील कपडया व्यतिरिक्त कोणताही दुवा हाती लागला नाही. मृतकाची ओळख उघड करण्याचे दृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न करुन ही यश हाती लागत नव्हते त्यामुळे पथकांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरापासुन 50 किलो मिटर अंतरावरील पोलीस पाटील यांच्याशी समन्वय साधून बेपत्ता व्यक्तीची माहीती संकलित करणे सुरु केले. याच दरम्याण गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, मौजे जलधरा पो. इस्लापूर ता. किनवट जि. नांदेड येथील एक इसम नामे मारोती गंगाराम डुकरे हे बेपत्ता असून त्यांची बेपत्ता असले बाबत कोणतीही मिसींग नोंद करण्यात आलेली नाही. त्यावरुन स्थागुशा कडील पथकांना सदरची बाब संशयास्पद वाटल्याने स्थागुशा कडील पोउपनि राजमल्लु व त्यांचे पथक तात्काळ मौजे जलधरा पो. इस्लापूर ता. किनवट जि. नांदेड येथे रवाना झाले. पथक प्राप्त माहिती प्रमाणे मारोती गंगाराम डुकरे यांचे घरी गेले असता सदर ठिकाणी त्याचा मुलगा व पत्नी असे मिळून आल्याने त्यांना मारोती गंगाराम डुकरे बाबत कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता चौकशी दरम्याण त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पथकाचा त्यांचे विरुध्द अधिक संशय बळावल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सर्वप्रथम उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मृतक मारोती गंगाराम डुकरे हा नेहमी दारु सेवन करुन त्यांना तसेच लोकांना त्रास देत असल्याने ते वैतागलेले होते व त्यामुळे सर्वाचे जिवन जगने असहय झाले होते या कारणावरुन त्यास जिवेठार मारुन त्याचे प्रेत पिवळया फारी मध्ये बांधून सहस्त्रकुंड धबधबा बंधा-यात पाण्यात टाकले असल्याची कबुली दिली. वरुन आरोपी 1) प्रदिप मारोती डुकरे वय 25 वर्ष, (मृतकाचा मुलगा) 2) पार्वतीबाई मारोती डुकरे वय 55 वर्ष, (मृतकाची पत्नी) रा. जलधरा पो. इस्लापूर ता. किनवट जि. नांदेड यांना ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि मनीष गावंडे, सपोनि/धिरज बांडे, सपोनि/पवन राठोड, पोउपनि/गजानन राजमलू, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/सै साजीद, सफौ योगेश गटलेवार, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोह/अजय डोळे, पोह/प्रशांत हेडाऊ, पोह/योगेश डगवार, पोह/बबलू चव्हाण, पोह/रुपेश पाली, पोह/निलेश राठोड, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोह/कुणाल मुंडोकार, पोह/ऋतुराज मेडवे, पोह/सचिन घूगे, पोह/मिथून जाधव, पोह/सोहेल मिट्ट , पोना/किशोर झेंडेकर, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/आकाश सुर्यवंशी, पोशि/अमित झेंडेकर, पोशि/देवेंद्र होले, पोशि/सुनिल पैठने, मपोना/ममता देवतळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव, चापोशि/अमित कुमरे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ तसेच ठाणेदार बिटरगांव सपोनि पांडुरंग शिंदे व पोउपनि सागर अन्नमवार व अंमलदार पो.स्टे. बिटरगांव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button